लॉकडाऊनमध्ये लग्न टळलं, नाराज तरुणाने केली आत्महत्या 

Youth commits suicide: लॉकडाऊन सुरू असताना एका तरुणाने आत्महत्या केली आहे. असं म्हलं जात आहे की, लॉकडाऊनमुळे त्याचा विवाह टळला आणि त्यामुळे तो नाराज होता.

wedding postponed due to lockdown upset youth commits suicide in jharkhand
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • ३० वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेत केली आत्महत्या 
  • लॉकडाऊनमुले या तरुणाचा विवाह टळला होता 
  • विवाह टळल्यामुळे तो तरुण नाराज होता 

जमशेदपूर: झारखंडमधील जमशेदपूर शहरात एका ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणाचा विवाह ठरला होता मात्र, लॉकडाऊनमुळे विवाह अनिश्चित काळासाठी टळला. या सर्वांमुळे हा तरुण नाराज असल्याचं बोललं जात आहे. यामुळेच त्रस्त तरुणाने घरातील पंख्याला गळफास घेत कथितपणे आत्महत्या केली. 

ही घटना जमशेदपूर शहरातील ओलीडीह पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. मृतक तरुणाची ओळख संजीत गुप्ता अशी झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला असून अधिक पास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी एमजीएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. 

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मृतक संजीत जेवल्यानंतर आपल्या खोलीत गेला. सकाळी त्याजे वडील राजेंद्र गुप्ता हे वॉशरूमसाठी संजीतच्या खोलीत गेले असता त्यांना संजीतचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

लग्नाच्या वयाच्या मुलाने आत्महत्या केल्याने संजीतचे वडील राजेंद्र गुप्ता हे खूपच खचले आहेत. संजीतचा विवाह बिहारमधील औरंगाबाद येथील एका तरुणीसोबत ठरला होता. त्यानुसार २५ एप्रिल रोजी दोघे विवाहबंधनात अडकणार होते. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊनचा कालावाधी संपूर्ण देशात वाढवण्यात आला. यामुळे लग्नाची तारीख अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. या सर्वांमुळे संजीत खूपच नाराज झाला होता आणि त्यामुळेच त्याने हे पाऊल उचललं असावं असं बोललं जात आहे. 

वडिलांनी गमावला तिसरा मुलगा 

लग्न टळल्यानंतर किराणा दुकान चालवणारा संजीत खूपच नाराज झाला होता आणि त्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत, मित्रांसोबत बोलणं देखील बंद केलं होतं. त्याच्या वडिलांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, आपलं लग्न टळळ्याला लॉकडाऊन जबाबदार असल्याचं संजीतने म्हटलं होतं आणि आत्महत्येचं पाऊल आता उचललं. संजीत याच्या मृत्युपूर्वी राजेंद्र गुप्ता यांनी आपल्या आणखी दोन मुलांना गमावलं आहे. एका मुलाचा २००० साली बुडून मृत्यू झाला होता तर दुसरा मुलगा २०१२ साली बेपत्ता झाला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी