जोनपूर: तुम्ही तुमचं काम करत असताना तुम्हाला लॉटरी लागल्याचं किंवा जॉकपॉट लागावा असं नेहमी वाटत असतं ना. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) जोनपूर (Jonpur) येथे मजुरांना खोदकाम करताना खजिना (treasure) सापडल्याची घटना समोर आली. येथे एका घराच्या उत्खननादरम्यान शौचालयाचा (toilet) खड्डा खोदताना मजुरांना सोन्याच्या नाण्यांनी भरलेला खजिना सापडला.
हा खजिना आपल्याला मिळावा म्हणून मजुर आपआपसांत भिडले आणि त्यानंतर त्यांनी तो खजिना घेऊन घटनास्थळावरुन पळ काढला. मजुरांनी पळ काढल्यानंतर घरमालकांच्या हातात फक्त सात नाणी लागली पण त्यासाठी त्याला बेड्या पडल्या आहेत. दरम्यान नाणी घेऊन पळून गेलेल्या मजुरांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडूनही नाणी जप्त केल्याची माहिती आहे. पोलीस अद्यापही मजुरांकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
Read Also : टोमॉटोनंतर सरकार स्वस्त करणार कांदा, उचलणार 'हे' पाऊल
हे संपूर्ण प्रकरण जोनपूरमधील मच्छली शहरातील आहे. येथील एका घराच्या खोदकामात ही सोन्याची नाणी सापडल्याची माहिती आहे. कजियाना परिसरातील एका घरात शौचालयाची टाकी बनवण्यासाठी खोदकाम सुरू होते. शौचालयाचा खड्डा खोदत असताना मजुरांना खड्ड्यामध्ये सोन्याच्या नाण्यांनी भरलेलं घबाड सापडलं. यानंतर मजुरांनी घरमालकाला न सांगता ही नाणी आपआपसांत वाटून घेतली. मजूर गेल्यानंतर घरमालकाने जेव्हा पाहिलं तेव्हा त्यालाही या मातीत ७ नाणी सापडली. मालकाने जेव्हा याबाबत मजुरांची विचारपूस केली तेव्हा त्यांना कळालं की तिथे सोन्याच्या नाण्यांनी भरलेलं भांडं होतं. ज्यामधील काही नाणीमजुरांनी आपापसात वाटून घेतली.
Read Also : अमेरिकेत समलैंगिक विवाहाला फेडरल संरक्षण
दरम्यान, खजिना सापडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घरमालकाकडून ७ नाणी जप्त करून त्यांना ताब्यात घेतले. पोलीस पोहचण्याआधीच मजुरांनी तेथून पळ काढला. उत्खनन करणाऱ्या मजुरांनी उर्वरित नाणी घेऊन पळ काढल्याचा आरोप मालकाने केला आहे.
नाणी मिळाल्याचा प्रकार मजुरांनी आणि मालकाने अनेकांपासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी माहिती मिळाली आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून विचारपूस केली. कसून चौकशी केल्यानंतर अखेर हा सर्व प्रकार पुढे आला. यांनंतर पोलिसांना सोन्याची नाणी आढळली. माहितीनुसार, ही नाणी इंग्रजांच्या काळातील असून १८८९ ते १९१२ या काळातील असल्याचं बोललं जात आहे.