पश्चिम बंगालमधील निवडणुकीची तयारी सुरू

West Bengal Assembly elections, Election Commission holds all party meet पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली. निवडणूक आयोगाने सर्वपक्षीय बैठक घेतली.

West Bengal Assembly elections
पश्चिम बंगालमधील निवडणुकीची तयारी सुरू 

थोडं पण कामाचं

  • पश्चिम बंगालमधील निवडणुकीची तयारी सुरू
  • निवडणूक आयोग १८ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत पश्चिम बंगालमध्ये विशेष मोहीम हाती घेणार
  • मतदार याद्या (voter list) अद्ययावत (update) करणार

कोलकाता (Kolkata): पश्चिम बंगालमधील (West Bengal) विधानसभेच्या निवडणुकीसाठी (Assembly elections) तयारी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी सर्वपक्षीय बैठक घेतली. यात निवडणुकीच्या नियोजनावर चर्चा झाली. निर्दोष मतदार यादी, मतदान केंद्रांवर बूथ दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती, तसेच निवडणूक काळात राज्यात कायदा-सुव्यवस्था आणि शांतता राखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त आवश्यक असल्याचे बैठकीत राजकीय पक्षांनी सांगितले. या मुद्यांची निवडणूक आयोगाने दखल घेतली. (West Bengal Assembly elections, Election Commission holds all party meet)

निवडणूक आयोग १८ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत पश्चिम बंगालमध्ये विशेष मोहीम हाती घेणार आहे. मोठ्या प्रमाणावर जनजागृती करुन नागरिकांना मतदार यादीत स्वतःचे नाव तपासून घेण्यासाठी आवाहन केले जाईल. ज्यांचे नाव अद्याप मतदार यादीत नाही, अशांना मतदार यादीत नाव नोंदवण्याची संधी दिली जाईल. ज्या व्यक्तींनी राहण्याचे ठिकाण बदलले आहे अशांची नावे तिथल्या यादीतून वगळणे, नव्या ठिकाणाच्या यादीत नमूद करणे ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. मृतांची नावे मतदारयादीतून वगळली जातील. मतदार याद्या जास्तीत जास्त निर्दोष केल्या जातील. मतदार याद्या (voter list) अद्ययावत (update) केल्या जातील. याच याद्यांच्या आधारे पुढे निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल.

कोरोना संकटाच्या सतत बदलत्या परिस्थितीवर लक्ष ठेवून योग्य वेळी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. मतदानासाठी जास्त बूथची व्यवस्था करण्याबाबत निवडणूक आयोग विचार करत आहे. कोविड प्रोटोकॉलच्या आधारे निवडणूक प्रक्रिया राबवणार असल्याचे संकेत निवडणूक आयोगाने सर्व पक्षांना दिले.

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदारयादी १५ जानेवारी २०२१ रोजी प्रसिद्ध केली जाईल. ही यादी ऑनलाइन पद्धतीने बघण्यासाठी उपलब्ध असेल. या यादीआधारे निवडणुकीचे नियोजन होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये २०१० पासून ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहेत. त्या २०२१ मध्ये होणार असलेल्या निवडणुकीच्या निमित्ताने तिसऱ्या टर्मसाठी रिंगणात उतरतील. ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांचा प्रयत्न सलग तिसऱ्यांदा सत्ता राखण्याचा असेल तर भाजपचा प्रयत्न सत्ता मिळवण्यासाठी असेल. 

लोकसभेसाठी २०१९मध्ये (Lok Sabha 2019 Election) झालेल्या निवडणुकीत ऐतिहासिक घटना घडली. तृणमूल काँग्रेसने (All India Trinamool Congress - TMC) २२ तर भाजपने (Bharatiya Janata Party - BJP) १८ जागांवर विजय मिळवला आणि काँग्रेसला दोन जागांवर विजय मिळाला. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच भाजप हा पश्चिम बंगालमधील मुख्य विरोधी पक्ष असल्याचे चित्र उभे राहिले. ज्या भाजपला पश्चिम बंगालमध्ये डावे पक्ष आणि तृणमूल काँग्रेसमुळे संधी मिळत नव्हती त्यांना लोकसभा निवडणुकीत एकदम ४२ पैकी १८ जागांवर विजय मिळाला. या विजयानंतर उत्साह वाढलेल्या भाजपने जनहिताच्या मुद्यांवर आक्रमक भूमिका घ्यायला सरुवात केली. नागरिकांचा भाजपला पाठिंबा मिळू लागला. भाजपला मिळणारे समर्थन वाढू लागताच पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात उघड संघर्ष सुरू झाला. मागील काही महिन्यात पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या सक्रीय कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. या घटनेनंतरही भाजपचे राज्यातील काम सुरू आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप हा संघर्ष तीव्र होत असतानाच अमित शहा यांनी पश्चिम बंगालचा दौरा केला. या दौऱ्यामुळे भाजप आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेस यांच्यात थेट राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात तृणमूल काँग्रेस (All India Trinamool Congress - TMC) सलग तिसऱ्यांदा सत्ता राखणार की भाजप (Bharatiya Janata Party - BJP) पश्चिम बंगाल काबीज करणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी