Mamata Banarjee । ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची घेणार भेट

Mamata Banarjee in Maharashtra ।पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी त्या मुंबईतील काही उद्योजकाचींही भेट घेणार आहेत.

west bengal cm mamata banarjee on visit mumbai meet Uddhav Thackeray and sharad pawar
ममता बॅनर्जी  
थोडं पण कामाचं
  • पश्चिम बंगालच्या मुंख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईच्या तीन दिवसीय दौऱ्य़ावर
  • मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार
  • पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी त्या मुंबईतील काही उद्योजकाचींही भेट

Mamata Banarjee । मुंबई : तृणमूल कॉग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banarjee)मुंबईच्या तीन दिवसीय दौऱ्य़ावर येणार आहेत. बॅनर्जी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांची भेट घेणार आहेत. तसेच पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी त्या मुंबईतील काही उद्योजकाचींही भेट घेणार आहेत. (west bengal cm mamata banarjee on visit mumbai meet Uddhav Thackeray and sharad pawar)

मविआच्या नेत्यांची भेट

आजपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्य़ावर आहेत. या दौऱ्य़ात त्या शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेणार आहे. परंतु उद्धव ठाकरे यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांची आणि बॅनर्जी यांची भेट होऊ शकणार नाही असे सांगण्यात येत आहे.

म्हणून ही भेट महत्त्वाची

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार आहे. या आघाडीतील नेत्यांची ममता बॅनर्जी भेट घेणार आहेत. काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेस इतर पक्षांशी संपर्क साधत आहे. तृणमूल, डावे पक्ष आणि काँग्रेस सोडून इतर विरोधी पक्षांच्या संपर्कात असल्याचा संदेश राजकीय वर्तुळात जाणार असल्याने ही भेट महत्त्वाची ठरणार आहे.

काँग्रेस- तृणमूलचे बिघडले संबध

गेल्या वर्षीपर्यंत काँग्रेस आणि तृणमूलचे चांगले संबध होते. परंतु पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलने भाजपला एकहाती रोखून दाखवले, तेव्हापासून राजकीय परिस्थिती बदलली. भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षाला ममता बॅनर्जी यांच्या रुपाने एक सक्षम चेहरा मिळाला असे मत अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले होते. याच वेळी काँग्रेसमधून अनेक बडे नेते तृणमूलमध्ये सामील झाले. त्यात गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईजिन्हो फलेरो आणि ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांच्या नावाचा समावेश आहे. दोन्ही नेत्यांना तृणमूल काँग्रेसने राज्यसभेत पाठवले.

काँग्रेसचेच किर्ती आझाद आणि राहुल गांधींचे निकटवर्तीस असलेले अशोक तंवर यांनीही पक्षाला रामराम करत तृणमूलचा झेंडा हाती घेतला. मेघालयमध्ये काँग्रेसचे १७ पैकी १२ आमदार तृणमूलमध्ये सामील झाले, त्यात मेघायलचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांचाही समावेश आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा झटका समजला जातो,

तृणमूल आणि काँग्रेसमध्ये अंतर

काँग्रेसचे नेतृत्व आपल्याला मान्य नाही असे संकेत सातत्याने तृणमूलने दिले आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी काँग्रेसने बोलवलेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीला तृणमूलने हजेरी लावली नाही. काँग्रेसने सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली तीनही कृषी कायदे मागे घेण्यासाठी आंदोलन केले होते. तर तृणमूलने काँग्रेसपासून अंतर ठेवून याच कायद्यांविरोधात आंदोलन केले होते. यापूर्वीही विरोधी पक्षांच्या बैठकीत तृणमूलने हजेरी लावली नव्हती. सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांची शेवटची भेट जुलै महिन्यात झाली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी