West Bengal: जनरेटरच्या वायरिंगमुळे पिकअप व्हॅनला लागला करंट, 10 जणांचा मृत्यू; अनेक जण जखमी

West Bengal Cooch Behar Accident:पिकअप व्हॅनला करंट लागल्यानं 10 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात अनेक जण भाजले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, पिकअपमध्ये 27 लोक होते.

West Bengal
पश्चिम बंगालमध्ये मोठी दुर्घटना  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • पिकअप व्हॅनला करंट लागल्यानं 10 जणांचा मृत्यू झाला.
  • एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, पिकअपमध्ये 27 लोक होते.
  • ही पिकअप व्हॅन जल्पेश (Jalpesh temple) मंदिरात जात होती.

कोलकत्ता: Cooch Behar Accident:  एका भीषण अपघाताची बातमी समोर येतेय. रविवारी रात्री पश्चिम बंगालच्या (West Bengal)  कूचबिहारमध्ये (Cooch Behar) उशिरा मोठी दुर्घटना घडली आहे. पिकअप व्हॅनला करंट लागल्यानं 10 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात अनेक जण भाजले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, पिकअपमध्ये 27 लोक होते. पिकअपच्या मागील बाजूस लावलेल्या जनरेटरच्या (डीजे सिस्टीम) वायरिंगमुळे हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. ही पिकअप व्हॅन जल्पेश (Jalpesh temple)  मंदिरात जात होती. या घटनेत भाजलेल्या लोकांना जलपाईगुडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ANI या वृत्तसंस्थेनुसार, पिकअप व्हॅनमध्ये 27 लोक होते. यापैकी 16 जणांना जलपाईगुडी येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. तर 10 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पिकअप व्हॅनमधील डीजे सिस्टीमच्या जनरेटरच्या वायरिंगमुळे ही घटना घडली असावी, असे पोलिसांचे म्हणणं आहे. त्यामुळे संपूर्ण गाडीत करंट पसरला असणार.

अधिक वाचा- वेटलिफ्टिंगमध्ये भारताला तिसरे गोल्ड मेडल, अचिंत्य शिवलीची कमाल

माथाभंगाचे एसपी म्हणाले की, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना जलपाईगुडी येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघातानंतर चालक पळून गेला. पिकअप गाडी जप्त करण्यात आली आहे. अपघाताचे नेमकं कारण समजण्यासाठी चालकाचा शोध घेण्यात येत आहे. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास मेखलीगंज पीएस अंतर्गत धारला पुलावर जल्पेशकडे प्रवासी घेऊन जात असतान ही दुर्घटना घडली आहे.

अपघातात 16 जण जखमी

माथाभंगाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमित वर्मा पुढे म्हणाले, त्याला चांगरबांधा बीपीएचसीमध्ये आणण्यात आले. तेथे उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याने 27 पैकी 16 जणांना चांगल्या उपचारांसाठी जलपाईगुडी जिल्हा रुग्णालयात पाठवलं आहे.. त्यांना किरकोळ दुखापत झाली असली तरी त्यांच्यावर योग्य उपचार होणे गरजेचे आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी 10 जणांना मृत घोषित केलं आहे. सर्व प्रवासी हे सीतालकुची पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असून त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखद घटनेची माहिती देण्यात आली आहे.

वर्मा म्हणाले, अपघातग्रस्त गाडी जप्त करण्यात आली आहे.  मात्र चालक पळून गेला आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. मदत आणि आवश्यक मदतीसाठी पोलीस समन्वय साधत आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी