पश्चिम बंगालमधील कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरींची प्रकृती अचानक बिघडली, जाणून घ्या आता कशी आहे त्यांची प्रकृती

गुरुवारी नितीन गडकरी हे सिलीगुडीतील शिवमंदिर ते सेवक छावणीपर्यंतच्या लांबीच्या रस्त्याच्या पायाभरणीसाठी आले होते. दार्जिलिंग जंक्शनजवळील डागापूर मैदानावर हा कार्यक्रम होत होता. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर असतानाच गडकरींना अस्वस्थ वाटत होते, त्याच वेळी कार्यक्रम रद्द करण्यात आला.

Breaking News
पश्चिम बंगालमधील कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरींची प्रकृती अचानक बिघडली, जाणून घ्या आता कशी आहे त्यांची प्रकृती  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • केंद्रीय मंत्र्यांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी झाली आहे.
  • नितीन गडकरी हे सिलीगुडीतील शिवमंदिर ते सेवक छावणीपर्यंतच्या लांबीच्या रस्त्याच्या पायाभरणीसाठी आले होते.
  • खासदार राजू बिस्ता यांच्या सिलीगुडी येथील मटीगारा येथील निवासस्थानी तीन डॉक्टरांचे पथक नितीन गडकरी यांच्यावर उपचार करत आहे.

Nitin Gadkari Health Update:  पश्चिम बंगालमधील (West Bengal)सिलीगुडी (Siliguri) येथे एका कार्यक्रमादरम्यान केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री (Union Minister of Roads and Transport) नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची प्रकृती अचानक बिघडली. ज्या ठिकाणी कार्यक्रमाचे व्यासपीठ (stage) होते तेथील एका खोलीत ते चहा पित होते, त्याचवेळी त्यांची तब्येत बिघडली. स्टेजवरून खाली आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते, त्यामुळे त्यांना ग्रीन रेस्ट रुममध्ये बसविण्यात आले. परंतु या रुममध्ये त्यांची तब्येत अधिकच बिघडू लागली होती. त्यानंतर  ग्रीन कॉरिडॉरमधून नेओटिया रुग्णालयाचे प्रसिद्ध डॉक्टर पीबी भुटिया यांना बोलविण्यात आले. भुटिया यांनी गडकरींवर प्राथमिक उपचार केले.  (Nitin Gadkari falls SICK on stage in Siliguri read in marathi) 

अधिक वाचा  :  भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट सामना लाइव्ह स्ट्रिमिंग

दरम्यान, गुरुवारी नितीन गडकरी हे सिलीगुडीतील शिवमंदिर ते सेवक छावणीपर्यंतच्या लांबीच्या रस्त्याच्या पायाभरणीसाठी आले होते. दार्जिलिंग जंक्शनजवळील डागापूर मैदानावर हा कार्यक्रम होत होता. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर असतानाच गडकरींना अस्वस्थ वाटत होते, त्याच वेळी कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यानंतर त्यांना ग्रीन रेस्ट रुममध्ये नेण्यात आले होते. परंतु या रुममध्ये बसल्यानंतर त्यांना अधिकच अस्वस्थ वाटू लागले होते. 

अधिक वाचा  : म्हातारपणात प्रेमात वेडी झालेल्या महिलेनं पतीची केली हत्या

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सलाईन सुरू करण्यात आले आहे. ग्रीन रुममध्येच गडकरींवर प्राथमिक उपचार केले गेले. त्यानंतर ग्रीन कॉरिडॉरमधून सिलीगुडीतील एका डॉक्टरला बोलवण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार केले. गडकरींना थोडं बरं वाटल्यानंतर दार्जिलिंगचे भाजप खासदार राजू बिस्ता गडकरींसोबत कारमधून त्यांच्या घराकडे रवाना झाले. केंद्रीय मंत्र्यांच्या मातीगारा येथील घरी उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.   

अधिक वाचा  : पोलिसच निघाले अमली पदार्थ तस्कर

मग त्या डॉक्टरांनी उपचार सुरू केले. त्यानंतर भाजपचे खासदार राजू बिस्ता हे नितीन गडकरींना घेऊन त्यांच्या माटीगारा येथील घरी गेले असून तेथे गडकरींवर उपचार केले जाणार आहेत, त्यांच्यासोबत डॉक्टर देखील आहेत. दरम्यान सिलीगुडीतील समारंभानंतर ते दालखोला येथे जाणार होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा कार्यक्रम रद्द होऊ शकतो आणि ते सिलीगुडी येथून परत दिल्लीला येऊ शकतात. 

यापूर्वीही गडकरींची प्रकृती अनेकदा खालावली 

यापूर्वीही अनेक कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकृती खालावली होती. यापूर्वी सप्टेंबर 2018 मध्ये अहमदनगरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान ते बेशुद्ध झाले होते. याशिवाय एप्रिल 2010 मध्ये दिल्लीच्या जंतरमंतरवरील एका कार्यक्रमात गडकरींना चक्कर आल्याने ते खाली पडले.

 आता कशी आहे गडकरींचा तब्येत 

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार राजू बिस्ता यांच्या सिलीगुडी येथील मटीगारा येथील निवासस्थानी तीन डॉक्टरांचे पथक नितीन गडकरी यांच्यावर उपचार करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार नितीन गडकरी यांची तब्येत सध्या स्थिर असल्याचं सांगितले जात आहे. लवकरच त्यांना दिल्ली येथे आणल्या जाणार आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी