Supreme Court: 'इथे कोणी पक्षच सोडलेला नाही...', हरीश साळवेंचा जोरदार युक्तिवाद, सिब्बल म्हणाले...

Supreme Court Argument: राज्यातील नव्या सरकारविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज (३ ऑगस्ट) सुनावणी पार पडली. पाहा यावेळी कोर्टात नेमका काय-काय करण्यात आला युक्तिवाद.

what did kapil sibal and harish salve arguement in hearing held in supreme court shiv sena vs shinde group
हरीश साळवेंचा जोरदार युक्तिवाद, सिब्बल म्हणाले... 
थोडं पण कामाचं
 • १६ आमदारांना अपात्र ठरविण्याच्या मुद्द्यावर पार पडली सुनावणी
 • सुप्रीम कोर्टात रंगला जोरदार युक्तिवाद
 • राज्यातील शिंदे सरकार टिकणार की जाणार?

Harish Salve: नवी दिल्ली: महाराष्ट्रात (Maharashtra) अस्तित्वात आलेलं नवं सरकार हे बेकायदेशीर असून १६ आमदारांना (MLA) कोर्टाने अपात्र ठरवावं अशा स्वरुपाची याचिका शिवसेनेने (Shiv Sena) केली आहे. याच याचिकेवर आज (३ ऑगस्ट) सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टात जोरदार युक्तिवाद झाल्याचं पाहायला मिळाला. यावेळी शिवसेनेची बाजू मांडणारे कपिल सिब्बल (Kapil Sibal) आणि शिंदे गटाची (Shinde Group) बाजू मांडणारे हरीश साळवे (Harish Salve) यांनी युक्तिवाद करताना अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. (what did kapil sibal and harish salve arguement in hearing held in supreme court shiv sena vs shinde group)

यावेळी कोर्टात या दोन्ही दिग्गज वकिलांनी काय युक्तिवाद केला हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. जाणून घ्या कोर्टात नेमका काय घडलं. 

शिवसेनेसाठी कपिल सिब्बल यांनी काय केला युक्तिवाद?

शिंदे गटाची बाजू मांडताना हरीश साळवेंनी काय केला युक्तिवाद?

 • उपाध्यक्षांवर अविश्वासचा ठराव होता असं असताना ते निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही कोर्टात आलो.
 • बंडखोरांनी पक्ष सोडला की नाही यावर निर्णय होणं आवश्यक 
 • ज्या अध्यक्षांना बहुमताने निवडलं आहे ते त्यांचे अधिकार कोर्टाने काढून घेणं हे घटनाबाह्य ठरु शकतं
 • बैठकीला गैरहजेरी म्हणजे पक्ष सोडला असा अर्थ होत नाही. 
 • कोर्टात आम्हीच पहिल्यांदा आलो. पण अपात्रतेची नोटीस आल्यानंतर आम्ही कोर्टात गेलो होतो. 
 • महापालिकेच्या निवडणुकांमध्ये चिन्ह कोणाला मिळणार यासाठी आम्ही निवडणूक आयोगात गेलो आहोत.  
 • मात्र, इथे कोणी पक्षच सोडलेला नाही. त्यामुळे पक्षांतर बंदी कायदा कसा लागू होईल?
 • ज्यांनी पक्ष सोडला असेल त्यांच्यावरच पक्षांतर बंदी कायदा लागू होतो
 • आयोगपुढील प्रकरण आणि कोर्टातील याचिका यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.

  अधिक वाचा: Eknath shinde vs shiv sena Supreme Court: शिंदे गटावर टांगती तलवार कायम, उद्याच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष
   
 • निवडणूक आयोग आणि आत्ताची सुनावणी याचा संबंध काय?
 • आम्ही एकाच राजकीय पक्षाचे मात्र नेता कोण हा प्रश्न
 • साळवेंकडून १९६९ मधल्या काँग्रेस फुटीच्या दाखला देण्यात आला
 • मुख्यमंत्री भेटत नाही तर त्या नेत्यांचा पक्ष बदलण्याचा अधिकार आमदारांना आहे. त्यामुळे हा अंतर्गत मामला आहे.
 • शिवसेनाअंतर्गत अनेक अडचणी आहेत 
 • पक्षात फूट असेल तर बैठक कशी बोलावणार?
 • पक्षांतर बंदी हा कायदा लागूच होत नाही, कारण की, आमदारांनी पक्ष सोडलेलाच नाही. ते अद्यापही पक्षातच आहे.
 • पक्षांतर बंदी कायदा हा लोकशाहीच्या आत्म्याला बदलू शकत नाही.
 • सिब्बलांनी दिलेले दावे साफ चुकीचे 
 • बहुमत गमावलेल्या पक्षासाठी पक्षांतर बंदी कायदा नेत्यासाठी शस्त्र असू शकत नाही. 

  अधिक वाचा: शिंदे गट आणि शिवसेना यांच्या संदर्भातील फैसला गुरुवार ४ ऑगस्ट रोजी होणार

असा जोरदार युक्तिवाद यावेळी दोन्ही बाजूने झाला आहे. या दोन्ही वकिलांशिवाय अभिषेक मनू सिंघवी, नीरज कौल, महेश जेठमलानी आणि महाधिवक्ता तुषार मेहता यांनी देखील युक्तिवाद केले. या सर्वांचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने पुढील सुनावणी उद्या होणार असल्याचं सांगितलं आणि आजची सुनावणी तहकूब केली. त्यामुळे आता उद्याच्या सुनावणीत नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी