लॉकडाऊनचा पार्ट वन उद्या संपणार, पुढे काय होणार? संपूर्ण देशाचं लक्ष

भारत सरकारनं स्पष्ट केलं आहे की, लॉकडाऊनची अंमलबजावणी झाली नसती तर 15 एप्रिलपर्यंत एकूण कोरोनाची प्रकरणे आठ लाखांपेक्षा जास्त झाली असती. याचा अर्थ लॉकडाऊननं आपला हेतू पूर्ण केला आहे.

pm modi
लॉकडाऊनचा पार्ट वन उद्या संपणार, पुढे काय होणार? संपूर्ण देशाचं लक्ष  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • राष्ट्रीय स्तरावर लॉकडाऊन वाढवलं जाईल का? , यावर सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
  • ओडिशा, पंजाब, महाराष्ट्र, बंगाल सारख्या राज्यांमध्ये 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. 
  • कोरोनाविरूद्धच्या लढाविषयी बोलताना सर्व राज्य सरकारे असे म्हणतात की लॉकडाऊनचा पाठपुरावा करणे बंधनकारक आहे.

नवी दिल्लीः  देशभरात कोरोनाचे एकूण रुग्णांची संख्या 9 हजारच्या पुढे गेली आहे. या भयानक व्हायरसमुळे जवळपास 300 लोकांना आपले प्राण गमावावे लागलेत. जर देशातल्या वेगवेगळ्या राज्यांबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रात जास्त रुग्ण आढळून आलेत. त्यानंतर दिल्लीत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. गेल्या 6 दिवसात कोरोनाचे रुग्णांमध्ये दुपटीनं वाढ झाली आहे. याबाबतच सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत त्या की, राष्ट्रीय स्तरावर लॉकडाऊन वाढवलं जाईल का?  ओडिशा, पंजाब, महाराष्ट्र, बंगाल सारख्या राज्यांमध्ये 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. 

आता आयुष्यही आणि जगही 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं की,  जर जीवन असेल तर जग आहे. पण मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी आपला नारा जरा बदलला आणि म्हटले की जिंदगी सुद्धा, जगसुद्धा. थ्री एलची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. डब्ल्यूएचओचं म्हणणं आहे की, कोरोनाविरूद्धच्या युद्धामध्ये आम्ही बर्‍याच काळासाठी आर्थिक क्रिया थांबवू शकत नाही. भारतालाही या दिशेने विचार करावा लागेल.

लॉकडाऊनवर सर्व राज्ये सहमत आहेत

कोरोनाविरूद्धच्या लढाविषयी बोलताना सर्व राज्य सरकारे असे म्हणतात की लॉकडाऊनचा पाठपुरावा करणे बंधनकारक आहे. जर तसे झाले नाही तर कदाचित आम्ही लॉकडाऊन पार्ट वनचा हेतू गमावू. यासह, बरीच राज्य सरकारे असे म्हणत की आपल्यासमोर अनेक आव्हाने आहेत, उदाहरणार्थ बिहार सरकारमधील मंत्री संजय झा म्हणाले की, आगामी काळात आपल्याला पूरांचीही तयारी करावी लागेल, याबरोबरच कृषी क्षेत्राकडेही पाहावे लागेल. लॉकडाऊनचा प्रश्न आहे तोपर्यंत पंतप्रधानांच्या आदेशाचे पालन केले जाईल. त्यांनी असंही म्हटलं आहे की कोरोनाविरूद्धच्या युद्धात आम्ही आर्थिक आव्हानांकडे दुर्लक्ष करू शकत नाही.

दरम्यान, उद्या ( मंगळवारी) म्हणजेच 14 एप्रिलला संपेल. दरम्यान, हा लॉकडाऊन पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर वाढविला जाणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. याच प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या सकाळी 10 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, आपल्याला या परिस्थितीतून वाट काढून पुढे जावं लागणार आहे. दरम्यान, यामुळे लॉकडाउन हटवला जाईल किंवा त्यात काही सूट दिली  जाईल अळी अटकळ सुरू झाली आहे. या सर्व प्रश्नांबरोबरच केंद्र सरकार उद्या आणखी काय-काय निर्णय घेणार हे समजणार आहे. पण एक गोष्ट महत्त्त्वाची आहे की, अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांनी आपआपल्या राज्यात लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी