नवी दिल्ली : केंद्र सरकार आयएएस कॅडरच्या (IAS Cadre) नियमांमध्ये बदल करणार आहे. केंद्र सरकारच्या (Central goverment) या निर्णयाच्या निषेधार्थ अनेक राज्य सरकारे उतरली आहेत. यापैकी बहुतांश बिगर-भाजप शासित राज्ये आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata banerjee)यांनी सर्वप्रथम हा मुद्दा उपस्थित केला होता आणि आठवडाभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांना याबाबत दोनदा पत्र लिहिले आहे. यानंतर महाराष्ट्र सरकार, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (bhupesh baghela) आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (ashok gehlot) यांनीही आक्षेप घेतला. आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून विरोध केला आहे. अखेर आयएएस कॅडर नियम दुरुस्तीबाबत वाद काय? (What is the IAS Cadre Rules Amendment Dispute? Why are states protesting?)