काय आहे जनतेचा कौल; 2024मध्ये भारतीयांना कोण हवा पंतप्रधान, मोदी कि राहुल का केजरीवाल

देशातील राजकीय नेते (Political leaders) आणि राजकीय पक्षांसह (Political parties) नागरिकांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha election) वेध लागले आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. पंतप्रधानपदासाठी (Prime Minister) जनता कोणाला पसंती देणार याचा अंदाज घेण्यास अनेकांनी सुरुवात झाली आहे.

Who is No. 1 in the PM's race; Namo, Kejriwal or Rahul Gandhi
PMच्या शर्यतीत कोण आहे नंबर 1; नमो, केजरीवाल की राहुल गांधी  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • सी व्हॉटरने चार राज्यांचा सर्व्हे केला आहे.
  • आसाम, प. बंगाल, तामिळनाडू आणि केरळ तसंच केंद्र शासित प्रदेश पाँडिचेरीमध्ये पंतप्रधान मोदींना पसंती
  • पाँडिचेरीमध्ये राहुल गांधी पंतप्रधान व्हावं हे फक्त ३.२२ टक्के लोकांना वाटतं

नवी दिल्लीः  देशातील राजकीय नेते (Political leaders) आणि राजकीय पक्षांसह (Political parties) नागरिकांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha election) वेध लागले आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. पंतप्रधानपदासाठी (Prime Minister) जनता कोणाला पसंती देणार याचा अंदाज घेण्यास अनेकांनी सुरुवात झाली आहे. (IANS- C Voter Survey) सीव्हॉटरने केलेल्या सर्व्हेत अनेकांना धक्का बसणारा निष्कर्ष निघाला आहे. भाजपसाठी आनंदाचा तर विरोधकांना ४४० चा झटका या सर्व्हेतून लागू शकतो. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यासोबतच तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी व आपचे अरविंद केजरीवालही पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत. या नेत्यांविषयी सी व्हॉटरने सर्व्हे केला असून यातून मतदारांचा कल काय आहे हे समोर आला आहे. सी व्हॉटरने चार राज्यांचा सर्व्हे केला आहे. यामध्ये आसाम, प. बंगाल, तामिळनाडू आणि केरळ तसंच केंद्र शासित प्रदेश पाँडिचेरीमध्ये हा विशेष सर्व्हे करण्यात आला. या राज्यांमध्ये २०२१ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. या राज्यांमधील लोकांची पहिली पसंती पंतप्रधान मोदींनाच आहे. आसाममध्ये ४३ टक्के लोकांनी मोदींना समर्थन दिलं आहे. त्यानंतर केजरीवाल यांना ११.६२ टक्के लोकांनी मत दिलं आहे. त्याखालोखाल १०.७ टक्के लोकांनी राहुल गांधी यांना समर्थन दिलं आहे.

राहुल बाबाला 'नो' चं 

२०१९ मध्ये राहुल गांधी यांनी केरळमध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, तिथेही जनतेने पंतप्रधान मोदींवरच विश्वास दाखवला. २८ टक्के लोकांनी मोदींना समर्थन दिलं आहे. त्यानंतर राहुल गांधी यांना २०.३८ टक्के आणि अरविंद केजरीवाल यांना ८.२८ टक्के जनतेचं समर्थन आहे.

पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान म्हणून मोदींना पसंती 

तामिळनाडूनध्ये काँग्रेसने सत्ताधारी दम्रुकला समर्थन दिलं आहे. तिथेही २९.५६ टक्के जनतेनं पुढील पंतप्रधान म्हणून मोदींनाच समर्थन दिलं आहे. त्यानंतर राहुल गांधींना २४. ६५ टक्के लोकांनी समर्थन दिलं आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची सत्ता आहे. मात्र तिथेही जनतेने मोदींवर विश्वास दाखवला आहे. पश्चिम बंगालमध्ये ४२.३७ टक्के लोकांनी मोदींना मत दिलं आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानी ममता बॅनर्जी असून त्यांना २६.०८ टक्के लोकांचं समर्थन मिळालं आहे. तर, राहुल गांधी यांना १४.४ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

पाँडिचेरीमध्ये ४९.६९ टक्के जनतेला मोदींना पंतप्रधान म्हणून पाहायचे आहे. तर, ११.८ टक्के जनतेने काँग्रेसच्या अन्य नेत्यांना समर्थन दिलं आहे. तर, राहुल गांधींचा स्वीकार करण्यास फक्त ३.२२ टक्के लोकांनी सहमती दाखवली आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी