Patanjali OrderMe App: पतंजलि लवकरच लॉन्च करणार, 'ऑर्डर मी' अॅप, जाणून घ्या याची वैशिष्ट्ये असे करा डाऊनलोड 

Patanjali OrderMe App: आयुर्वेदिक प्रोडक्टची विक्री आता एका अॅपच्या माध्यमातून होणार आहे. या अॅपचे नाव OrderMe असे आहे. हे अॅप पुढील आठवड्यात लॉन्च करण्यात येणार आहे.

what is the patanjali orderme app know how to download it in marathi
Patanjali OrderMe App: पतंजलि लवकरच लॉन्च करणार  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

 • पतंजलि OrderMe अॅप योग गुरू रामदेव आणि पतंजली यांचा पुढाकार आहे. 
 • याच्या माध्यमातून लोक मेड इन इंडिया प्रोडक्ट खरेदी करू शकणार आहे. 
 • भारतीय वस्तू खरेदी करण्यासाठी एक व्यासपीठ बाबा रामदेव उपलब्ध करून देणार 

Patanjali OrderMe App: योग गुरू बाबा रामदेव यांची कंपनी पतंजलि सतत आपल्या व्यापाराचा सतत विस्तार करत आहे. डिजिटल होत असलेली मार्केट व्यवस्था पाहता आता बाबा रामदेव यांच्या पतंजलि (Patanjali)चे आयुर्वेदिक प्रोडक्ट आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर विक्री करण्याची योजना आखण्यात आली आहे. आयुर्वेदिक प्रोडक्टची विक्री आता एका अॅपच्या माध्यमातून होणार आहे. या अॅपचे नाव OrderMe असे आहे. हे अॅप पुढील आठवड्यात लॉन्च करण्यात येणार आहे. यात देशभरात आयुर्वेदिक प्रोडक्टची डिलिव्हरी केली जाऊ शकते. हे अॅप तुम्हाला तुमच्या जवळच्या दुकानाशी कनेक्ट करणार त्याच्या माध्यमातून होम डिलिव्हरी होणार आहे. या एक्सक्ल्यूसिव्ह ई-कॉमर्स साइटवर केवळ भारतात निर्मित प्रोडक्ट विकले जाणार आहेत. या अॅपच्या माध्यमातून हे सुनिश्चित केले जाईल की भारतातील प्रत्येक नागरिकाकडून स्वदेशी सामान खरेदी केले जाईल आणि त्याचा वापर होईल. 
 
 या अॅपचे शॉर्टकट नाव  'OM' आहे. हे ऑर्डर मी या इंग्रजी शब्दांचे पहिले दोन अक्षर आहेत. भारतीय आध्यामिक परंपरेतील हे एक चिन्ह आहे.  लॉकडाऊनमध्ये प्रोडक्टची डिमांड आणि सप्लाय यांत येणाऱ्या अडचणी पाहून हे अॅप लॉन्च करण्याची योजना बनवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची गोष्ट केली होती. यात त्यांनी लोकल प्रोडक्ट आणि स्वदेशी प्रोडक्ट खादी, पतंजली सारख्या सामानांचा वापरावर भर देण्यास सांगितले होते. त्याच्या ४८ तासाच या अॅपचा प्रस्ताव देण्यात आला. हे अॅपच्या लॉन्चनंतर कोरोना महामारी दरम्यान लोकांना आयुर्वेदिक प्रोडक्ट घरबसल्या सहज मिळू शकणार आहे. 

Patanjali OrderMe App:  काय आहे याच्या सेवा 

 • पतंजलि आपले प्रोडक्ट या माध्यमातून विकणार आहे. 
 •  तसेच अशा व्यक्ती ज्या आपल्या स्टोअरमध्ये स्वदेशी वस्तू विकत असतील त्यांच्याशी संपर्क साधला जाईल. 
 •  ही वेबसाइट काही तासाच ग्राहकांना घरी फ्री डिलिव्हरी देणार 
 •  पतंजली च्या १५०० डॉक्टरांच्या माध्यमातून २४ तास मोफत वैद्यकीय सल्ला देण्यात येणार 
 •  या अॅपच्या माध्यमातून योगा शिकवणीही दिली जाणार 

 Patanjali OrderMe App: असा डाऊनलोड करा अॅप 

 •  हे अॅप मोबाईल युजर्सला विविध ऑपरेटिंग सिस्टिमद्वारे प्ले स्टोरच्या माध्यमातून डाऊनलोड करता येणार आहे. 
 •  अँड्रॉइड युजर्स गुगल प्ले स्टोअरच्या माध्यमातून डाऊनलोड करू शकणार 
 •  IOS युजर्स अॅपल अॅप स्टोअरच्या माध्यमातून डाऊनलोड करू शकणार 
 •  हे अॅप इतर डिलिव्हरी अॅप प्रमाणेच काम करणार जसे सध्या बाजारात इतर डिलिव्हरी अॅप आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी