Patanjali OrderMe App: योग गुरू बाबा रामदेव यांची कंपनी पतंजलि सतत आपल्या व्यापाराचा सतत विस्तार करत आहे. डिजिटल होत असलेली मार्केट व्यवस्था पाहता आता बाबा रामदेव यांच्या पतंजलि (Patanjali)चे आयुर्वेदिक प्रोडक्ट आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर विक्री करण्याची योजना आखण्यात आली आहे. आयुर्वेदिक प्रोडक्टची विक्री आता एका अॅपच्या माध्यमातून होणार आहे. या अॅपचे नाव OrderMe असे आहे. हे अॅप पुढील आठवड्यात लॉन्च करण्यात येणार आहे. यात देशभरात आयुर्वेदिक प्रोडक्टची डिलिव्हरी केली जाऊ शकते. हे अॅप तुम्हाला तुमच्या जवळच्या दुकानाशी कनेक्ट करणार त्याच्या माध्यमातून होम डिलिव्हरी होणार आहे. या एक्सक्ल्यूसिव्ह ई-कॉमर्स साइटवर केवळ भारतात निर्मित प्रोडक्ट विकले जाणार आहेत. या अॅपच्या माध्यमातून हे सुनिश्चित केले जाईल की भारतातील प्रत्येक नागरिकाकडून स्वदेशी सामान खरेदी केले जाईल आणि त्याचा वापर होईल.
या अॅपचे शॉर्टकट नाव 'OM' आहे. हे ऑर्डर मी या इंग्रजी शब्दांचे पहिले दोन अक्षर आहेत. भारतीय आध्यामिक परंपरेतील हे एक चिन्ह आहे. लॉकडाऊनमध्ये प्रोडक्टची डिमांड आणि सप्लाय यांत येणाऱ्या अडचणी पाहून हे अॅप लॉन्च करण्याची योजना बनवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची गोष्ट केली होती. यात त्यांनी लोकल प्रोडक्ट आणि स्वदेशी प्रोडक्ट खादी, पतंजली सारख्या सामानांचा वापरावर भर देण्यास सांगितले होते. त्याच्या ४८ तासाच या अॅपचा प्रस्ताव देण्यात आला. हे अॅपच्या लॉन्चनंतर कोरोना महामारी दरम्यान लोकांना आयुर्वेदिक प्रोडक्ट घरबसल्या सहज मिळू शकणार आहे.