End of Earth | जग कधी नष्ट होणार? सुर्याच्या अस्तामुळे होणार जगाचा शेवट, शास्त्रज्ञ म्हणतात...

Sun : पृथ्वीचा (Earth) अंत कधी आणि कसा होईल या प्रश्नाचे उत्तर शास्त्रज्ञ दीर्घकाळापासून शोधत आहेत? जगभरातील अनेक शास्त्रज्ञ हे गूढ उकलण्यात गुंतले आहेत. अनेक वेळा असे वृत्त आले आहे की माया दिनदर्शिकेनुसार किंवा इतर कोणत्याही पैगंबरानुसार जगाचा अंत (End of Lief on Earth) अमूकवेळी होईल? पण शेवटी हे अंदाज प्रत्येक वेळी चुकीचे ठरले. आता शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या अंताची खरी तारीख आणि कारण शोधण्याचा दावा केला आहे.

how & when life on earth will end
पृथ्वीवरील जीवसृष्टी कशी आणि कधी नष्ट होणार 
थोडं पण कामाचं
  • पृथ्वी आणि पृथ्वीवरील जीवनसृष्टी कधी नष्ट होणार
  • सुर्याचा होणार विस्तार आणि महाप्रचंड स्फोट
  • शास्त्रज्ञांनी व्यक्त केला अंदाज

Collapse of Sun : नवी दिल्ली :  पृथ्वीचा (Earth) अंत कधी आणि कसा होईल या प्रश्नाचे उत्तर शास्त्रज्ञ दीर्घकाळापासून शोधत आहेत? जगभरातील अनेक शास्त्रज्ञ हे गूढ उकलण्यात गुंतले आहेत. अनेक वेळा असे वृत्त आले आहे की माया दिनदर्शिकेनुसार किंवा इतर कोणत्याही पैगंबरानुसार जगाचा अंत (End of Lief on Earth) अमूकवेळी होईल? पण शेवटी हे अंदाज प्रत्येक वेळी चुकीचे ठरले. आता शास्त्रज्ञांनी पृथ्वी नष्ट होण्याची खरी तारीख आणि कारण शोधण्याचा दावा केला आहे. सूर्यामुळे (Sun) आणि सुर्याच्या अस्ताबरोबरच पृथ्वी संपणार आहे. (When & how, life on Earth will end?) 

सुर्याचा होणार विस्तार आणि प्रचंड स्फोट

शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, सुर्याचा आणि जगाचा अंत यांचा संबंध आहे. सुर्यामुळेच जगाचा अंत होणार आहे. सूर्याचा मोठा विस्तार होणार आहे आणि यात संपूर्ण विश्व जळून राख होईल. सूर्य अजूनही तारुण्यातच असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. अशा परिस्थितीत, सुर्यावरील स्फोटाच्या वेळी आपल्यापैकी कोणीही जिवंत राहणार नाही. आजपासून ५ अब्ज वर्षांनंतर सूर्यामध्ये स्फोट होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे केवळ पृथ्वीच नाही तर सूर्यावर अवलंबून असलेले इतर कोणतेही ग्रह नष्ट होतील.

द सनच्या अहवालानुसार, पाच अब्ज वर्षांनंतर सूर्यामध्ये असलेला हायड्रोजन कोर काम करणे थांबवेल आणि त्यानंतर सूर्य उष्णता निर्माण करू शकणार नाही. यामुळे इतर ग्रहही थंड होतील. यासोबतच शास्त्रज्ञांनी सांगितले की, सूर्यामुळे नष्ट होणाऱ्या ग्रहांमध्ये बुध आणि शुक्र यांचाही समावेश आहे. पण पृथ्वीवर जी विध्वंस होईल ती इतरत्र कुठेही होणार नाही.

पृथ्वीचा कसा होणार अंत

जेव्हा सूर्य संपेल तेव्हा सूर्याच्या शेवटच्या उष्णतेने सर्व महासागर कोरडे होतील. त्यावेळी इतका कडक ऊन पडेल की माणसाचा जीव जाईल. त्वचा जळण्यास सुरवात होईल. या कारणास्तव, तज्ञांनी म्हटले आहे की, लवकरात लवकर एक ग्रह शोधला पाहिजे, जिथे आतापासून मानवांना स्थायिक करण्याची तयारी केली पाहिजे. जेणेकरून ५ अब्ज वर्षांनंतर जेव्हा मानव पृथ्वीचा अंत करेल, तेव्हा मानव दुसऱ्या ग्रहावर सुरक्षित असेल.

येत्या काही वर्षांत पृथ्वीवरील जीवन (Life on Earth)संपेल का? असा प्रश्न आता समोर ठाकला आहे. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की पृथ्वीचा (Earth) अंतर्भाग अपेक्षेपेक्षा वेगाने थंड होतो आहे. याचा अर्थ आपली पृथ्वीही बुध (Mercury) आणि मंगळ (Mars) यांप्रमाणे अपेक्षेपूर्वी निष्क्रिय होईल. ईटीएच, झुरिच यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी प्राथमिक खनिज ब्रिजमनाइटच्या थर्मल गुणधर्मांचा अभ्यास केला. संशोधकांच्या टीमने एक मोजमाप प्रणाली विकसित केली आहे जी पृथ्वीच्या आत असलेल्या दबाव आणि तापमानाच्या स्थितीत प्रयोगशाळेत ब्रिजमनाइटची थर्मल चालकता मोजते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी