शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा हिंसाचार: कुठे झाली पोलिसांकडून चूक, काय करत होते वरिष्ठ पोलीस अधिकारी?

प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चादरम्यान दिल्लीत हिंसाचार झाला. दिल्ली पोलिसांनी हिंसाचारासाठी भडकवणाऱ्या संशयितांवर कारवाई चालू केली आहे. उपद्रव आणि हिंसेसाठी आतापर्यंत 22 एफआयआर नोंदवल्या आहेत.

Delhi farmers protest violence
शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा हिंसाचार: कुठे झाली पोलिसांकडून चूक, काय करत होते वरिष्ठ पोलीस अधिकारी?  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झाला हिंसाचार आणि चकमकी
  • लाल किल्ल्याच्या तटावर पोहोचले आंदोलनकर्ते, आपला झेंडा फडकवला
  • ठरलेल्या वेळेच्या आधीच मोर्चा काढल्याचा दिल्ली पोलिसांचा आरोप

नवी दिल्ली: प्रजासत्ताकदिनी (Republic Day) शेतकऱ्यांच्या मोर्चादरम्यान (farmers rally) हिंसा (violence) आणि उपद्रवाच्या (disturbance) घटना समोर आल्या आहेत. शेतकऱ्यांचा एक समूह यावेळी लाल किल्ल्याच्या (Red Fort) तटांपर्यंत पोहोचला आणि तिथे त्यांनी आपला झेंडा (flag) फडकवला. आयटीओसह (ITO) दिल्लीच्या अनेक भागांमध्ये आंदोलनकर्ते (protestors) आणि पोलिसांच्यात (police) चकमकी (clashes) झाल्या. यादरम्यान पोलिसांनी अश्रुधूर (tear gas) आणि लाठीचार्ज (lathicharge) केला. यात दिल्ली पोलीसदलातील (Delhi police) 80हून अधिक पोलीस आणि किमान 10 शेतकरी जखमी (injured) झाले. आंदोलनकर्ते आणि दिल्ली पोलिसांच्यात याबाबत सहमती (agreement) असून आणि मोर्चाचा मार्गही आखलेला (route planned) असूनही हा प्रकार घडला.

दिल्ली पोलिसांनी दाखल केल्या 22 एफआयआर

दिल्ली पोलिसांनी काल झालेल्या हिंसाचारासाठी 22 एफआयआर दाखल केल्या आहेत. प्रश्न असा आहे की मोर्चाचा मार्ग आधीपासूनच ठरलेला असून आणि दिल्ली पोलीस तयारीत असूनही शेतकरी लाल किल्ल्यापर्यंत पोहोचलेच कसे. हा मोर्चा ठरलेल्या मार्गांवरूनच काढण्यात येणार होता. मात्र तो सुरू झाल्यानंतर शेतकरी ट्रॅक्टरवर स्वार होऊन दिल्लीच्या उत्तर, पूर्व आणि पश्चिमेच्या भागात पांगले.

ठरवण्यात आलेल्या गोष्टींचे पालन झाले नाही- दिल्ली पोलीस

हिंदुस्तान टाइम्सच्या बातमीनुसार एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले,'ट्रॅक्टर मोर्चावर ज्या गोष्टींवर सहमती बनली होती त्यांचे पालन झाले नाही. शेतकरी मोठ्या संख्येने होते आणि याचा फायदा घेत ते शहराच्या चारी बाजूंना पोहोचले. गाझीपूरमध्ये त्यांनी ठरलेल्या वेळेच्या आधीच मोर्चाला सुरुवात केली, त्यांनी बॅरिकेड्स तोडायला सुरुवात केली जेव्हा बैठकीत असे ठरले होते की पोलीस त्यांना आपल्यासोबत घेऊन पुढे जातील. सिंघू सीमेवरही त्यांनी 11 वाजताच्या ठरलेल्या वेळेच्या आधीच मोर्चा काढला. तिथला मोर्चा सुरुवातीला शांततापूर्ण होता आणि संजय गांधी ट्रान्सपोर्ट नगरवरून परत फिरणार होता, मात्र त्यांनी यास नकार दिला आणि पुढे जाण्यावर अडून बसले. नंतर शेतकरी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गेले.’ या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठ्या संख्येने फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

यासाठी दोन ते अडीच लाख शेतकरी येण्याचा अंदाज होता. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पोलीस आणि निमलष्करी दलांची संख्या शेतकऱ्यांच्या तुलनेत कमी पडली. गाझीपूरमध्ये शेतकऱ्यांनी त्यांचे ऐकण्यास नकार दिला आणि पोलिसांवर दगडफेकही केली. यानंतर पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला.

शेतकरी नेते शेतकऱ्यांना समजावण्यात असमर्थ

एका पोलीस अधिकाऱ्याने याबद्दल बोलताना म्हटले, 'बहुतांश शेतकरी आपल्या नेत्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास तयार नव्हते. प्रत्येक सीमेवर आम्ही 10 ते 12 शेतकरी नेत्यांच्या संपर्कात होतो. त्यांनी सांगितले की ते आपल्या लोकांना नियंत्रित करू शकत नाहीत आणि त्यांनी आपली असमर्थता व्यक्त केली. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे अनेक समूह होते. आयटीओवर काही शेतकरी असे होते ज्यांना इंडिया गेट आणि लाल किल्ल्यावर जायचे होते.' बातम्यांनुसार त्यांनी सांगितले की हे शेतकरी जेव्हा वेगवेगळ्या गटांत गेले तेव्हा ते वेगवेगळ्या दिशांनी रवाना झाले आणि पोलिसांनी सुरक्षा वाढवण्याच्या सूचना दिल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी