omicron virus 'ओम्रिकॉन' नावाचा कोरोना विषाणूचा नवा अवतार सक्रीय, संकट वाढण्याचा धोका

WHO designates new coronavirus strain as ‘variant of concern’, names it ‘Omicron’ 'ओम्रिकॉन' (तांत्रिक नाव - VOC B.1.1529) नावाचा कोरोना विषाणूचा नवा अवतार सक्रीय झाला आहे. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेसह जगातील अनेक देश सावध झाले आहेत. कोरोना संकटाची तीव्रता वाढू नये यासाठी खबरदारी घेण्यास सुरुवात झाली आहे.

WHO designates new coronavirus strain as ‘variant of concern’, names it ‘Omicron’
'ओम्रिकॉन' नावाचा कोरोना विषाणूचा नवा अवतार सक्रीय, संकट वाढण्याचा धोका 
थोडं पण कामाचं
  • 'ओम्रिकॉन' नावाचा कोरोना विषाणूचा नवा अवतार सक्रीय, संकट वाढण्याचा धोका
  • 'ओम्रिकॉन' सर्वाधिक वेगाने मानवी शरीर आजाराने बाधीत करतो
  • कोरोना संकटाची तीव्रता वाढू नये यासाठी खबरदारी घेण्यास सुरुवात

WHO designates new coronavirus strain as ‘variant of concern’, names it ‘Omicron’ नवी दिल्ली: 'ओम्रिकॉन' (तांत्रिक नाव - VOC B.1.1529) नावाचा कोरोना विषाणूचा नवा अवतार सक्रीय झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संशोधकांनी सर्वात आधी या विषाणूची माहिती जागतिक आरोग्य संघटनेला दिली. पाठोपाठ इस्रायल, बेल्जियम, बोत्सवाना आणि हाँगकाँगमधूनही 'ओम्रिकॉन' मानवी शरीरात आढळल्याचे जागतिक आरोग्य संघटनेला कळवण्यात आले. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेसह जगातील अनेक देश सावध झाले आहेत. कोरोना संकटाची तीव्रता वाढू नये यासाठी खबरदारी घेण्यास सुरुवात झाली आहे.

मानवी शरीरात आढळलेल्या कोरोना विषाणूत आतापर्यंत शेकडो बदल झाले आहेत. जगभरात कोरोना विषाणूचे वेगवेगळे अवतार सक्रीय आहेत. पण 'ओम्रिकॉन' नावाचा कोरोना विषाणूचा नवा अवतार धोकादायक आहे. प्राथमिक माहितीनुसार, 'ओम्रिकॉन' सर्वाधिक वेगाने मानवी शरीर आजाराने बाधीत करतो. या विषाणूचा संसर्ग वेगाने पसरू शकतो. जगात अस्तित्वात असलेल्या अनेक कोरोना प्रतिबंक लस या विषाणूला प्रतिबंध करण्यात अपयशी ठरत असल्याचे आढळले आहे. अद्याप भारतात हा विषाणू आढळलेला नाही. भारतीय कोरोना प्रतिबंधक लसचा 'ओम्रिकॉन'ला प्रतिबंध करण्यासाठी उपयोग होतो की नाही हे अद्याप जाहीर झालेले नाही. तज्ज्ञ आवश्यक त्या तपासण्या करत आहेत.

चिंतेची बाब म्हणजे इस्रायलमध्ये कोरोना प्रतिबंधक लसचा बूस्टर डोस घेतलेल्या एका व्यक्तीला 'ओम्रिकॉन'मुळे कोरोना झाला. यामुळे जास्त खबरदारी घेण्याचा निर्णय झाला आहे. जागतिक आरोग्य संघटना 'ओम्रिकॉन' बाबत वेगवेगळ्या देशांकडून सविस्तर तपशील मागवत आहेत. पुरेशी माहिती हाती आल्यानंतर विश्लेषण करुन पुढे काय करावे यासाठी मार्गदर्शन करणे शक्य असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले. अद्याप पुरेशी माहिती हाती आलेली नाही यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने 'ओम्रिकॉन' या विषयावर चर्चेसाठी बोलाविलेली बैठक पुढे ढकलली आहे. मात्र सर्व देशांना खबरदारी घेण्यास बजावले आहे. 

भारतात १५ डिसेंबर २०२१ पासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा मोठ्या प्रमाणावर सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. हा विचार सुरू असतानाच 'ओम्रिकॉन'बाबतचे वृत्त जगजाहीर झाले आहे. यामुळे भारत सरकारने सर्व बाजू तपासून सखोल विचार करुनच निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. 

'ओम्रिकॉन'मुळे कोरोना होत असला तरी या कोरोनाचे स्वरुप किती गंभीर आहे हे अद्याप लक्षात आलेले नाही. दक्षिण आफ्रिकेत 'ओम्रिकॉन'मुळे कोरोना झालेल्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या वेगाने सुरू असलेल्या घडामोडींवर जागतिक आरोग्य संघटना लक्ष ठेवून आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी