दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १३ एप्रिल २०२०: पंतप्रधान उद्या संबोधणार ते मोदींचा जुना फोटो

 Headlines of the 13th April  2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

Daily news
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १३ एप्रिल २०२०  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई:  दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १३ एप्रिल २०२०: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... उद्या ( मंगळवारी) म्हणजेच १४ एप्रिल रोजी संपेल. दरम्यान, हा लॉकडाऊन पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर वाढविला जाणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. याच प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे,  गेल्या २४ तासात देशभरात ३५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतांचा आकडा ३०८ पर्यंत जाऊन पोहचला आहे. तिसरी महत्त्वाची आजची बातमी आहे, महाराष्ट्रात आज नव्या 82 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात मुंबईत 59 नवे रुग्ण आढळलेत. यासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 2064 वर पोहोचली आहे. चौथी महत्त्वाची बातमी, रातोरात तयार झालेल्या आणि ज्याची वैधता व प्रक्रिया अद्याप संशयातीत नाही, अशा पीएम केअर फंडला सीएसआर अंतर्गत निधी स्वीकारण्याची मुभा केंद्र सरकारकडून तातडीने दिली जाते. पाचवी महत्त्वाची बातमी, रामायणातील सीता म्हणजेच अभिनेत्री दीपिका चिखलखिया सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. दीपिकाने आता पंतप्रधान मोदींसह एक जुना फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये लालकृष्ण अडवाणीही दिसत आहेत. या सर्व बातम्या सविस्तर वाचूया. 

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुन्हा देशाला संबोधणार! : पंतप्रधान मोदी हे उद्या (१४ एप्रिल) देशातील जनतेला संबोधित करणार आहे. देशातील लॉकडाऊन वाढविला जाणार की नाही याविषयी मोदी बोलण्याची शक्यता आहे.  सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  2. देशातील मृतांचा आकडा वाढला, कोरोनाचे थैमान थांबता थांबेना! : देशात रुग्णांची संख्या सतत वाढत असून आता मृतांचा आकडा देखील वाढू लागला आहे. मागील २४ तासात देशात ३५ जणांचा मृत्यू झाला आहे.  सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  3. Corona Virus & Lockdown LIVE Updates: राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दोन हजारच्या पार, 82 नव्या रुग्णांची नोंद: महाराष्ट्रात आज नव्या 82 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात मुंबईत 59 नवे रुग्ण आढळलेत. यासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 2064 वर पोहोचली आहे.  सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  4. केंद्राकडून राज्यांवर झालेल्या अन्यायावर काँग्रेसचे टीकास्त्र: रातोरात तयार झालेल्या आणि ज्याची वैधता व प्रक्रिया अद्याप संशयातीत नाही, अशा पीएम केअर फंडला सीएसआर अंतर्गत निधी स्वीकारण्याची मुभा केंद्र सरकारकडून तातडीने दिली जाते.  सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  5. रामायणातील सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने शेअर केला पंतप्रधान मोदींचा अत्यंत जुना फोटो! : रामायणातील सीता म्हणजेच अभिनेत्री दीपिका चिखलखिया सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. दीपिकाने आता पंतप्रधान मोदींसह एक जुना फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये लालकृष्ण अडवाणीही दिसत आहे.  सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी