दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १४ एप्रिल २०२०: ३ मेपर्यंत लॉकडाऊन ते कोरोनामुळे क्रिकेटरचा मृत्यू 

Headlines of the 14th April  2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

Daily news
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १४ एप्रिल २०२०  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई:  दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १४ एप्रिल २०२०: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... २१ दिवसांसाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आता ३ मे पर्यंत कायम राहणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी याबाबतची घोषणा केली आहे.  '२० एप्रिलपर्यंत प्रत्येक भागाची बारकाईने पाहणी केली जाईल.  दुसरी महत्त्वाची बातमी, कोरोनामुळे महाराष्ट्रात होणारे मृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या मृत्यूचे विश्लेषण करणे आणि त्याचे प्रमाण कमी करण्याकरिता आरोग्य विभागाने मुंबई अणि परिसरासाठी तसेच उर्वरित महाराष्ट्रासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.  तिसरी महत्त्वाची बातमी, मंगळवारी ससूनमध्ये उपचार घेत असलेल्या चौघांचा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व ससून रुग्णालयात उपचार घेत होते. आता मृतांची संख्या आता 38 झाली आहे. मृतांमध्ये घोरपडी गावातील 77 वर्षीय, तर कोंढव्यातील 42 आणि 50 वर्षीय महिलेसह एका 27 वर्षीय तरुणाचा समावेश आहे.

चौथी बातमी महत्त्वाची म्हणजे,  देशवासियांना केलेल्या आवाहननंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेसबुक आणि ट्वीटर या सोशल मीडिया अकाउंटचे डीपी तात्काळ बदलले. पंतप्रधानांनी मास्क बांधलेला फोटो सोशल मीडियावर अकाउंटवर अपलोड करुन नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे. पाचवी महत्त्वाची बातमी आहे, पाकिस्तानचा माजी क्रिकेट जफर सरफराज यांचा कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर मृत्यू झाला आहे. माजी क्रिकेटर यांनी अखेरचा श्वास घेण्यापूर्वी अनेक अडचणींचा सामना केला.  या सर्व बातम्या सविस्तर वाचूया. 

  1. देशभरात ३ मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार: पंतप्रधान मोदी:  २१ दिवसांसाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आता ३ मे पर्यंत कायम राहणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी याबाबतची घोषणा केली आहे.  सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  2. राज्यातील मृत्यू रोखण्यासाठी राज्यात दोन समित्यांची नियुक्ती: कोरोनामुळे महाराष्ट्रात होणारे मृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या मृत्यूचे विश्लेषण करणे आणि त्याचे प्रमाण कमी करण्याकरिता आरोग्य विभागाने मुंबई अणि परिसरासाठी तसेच उर्वरित महाराष्ट्रासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.  सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  3. पुणेकरांची चिंता वाढली, पुण्यात मृतांचा आकडा वाढला: पुण्यात आज अवघ्या काही तासांमध्ये चार कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यानं चिंतेत आणखीन भर पडली आहे. राज्यात सर्वात आधी कोरोनानं शिरकाव केलेल्या पुण्यात आता मृत्यूचं सत्र सुरू झालं आहे.  सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  4. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला DP बदलला! : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधल्यानंतर अवघ्या काही मिनिटात आपले सोशल मीडियावर असणाऱ्या अधिकृत अकाउंटचे डीपी देखील बदलले. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  5. कोरोना व्हायरसमुळे या क्रिकेटरचा मृत्यू: क्रिकेट जगतातील एक जुना तारा निखळला आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेट जफर सरफराज यांचा कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर मृत्यू झाला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
     

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी