दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १५ एप्रिल २०२०: देशात कोरोनाबाधितांचा संख्येत वाढ ते यंदाच्या पावसाचा अंदाज

Headlines of the 15th April  2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

Daily news
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १५ एप्रिल २०२०  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई:  दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १५ एप्रिल २०२०: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे...  देशात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. दररोज रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. देशात आज कोरोना रुग्णांची संख्या 11,933वर गेली आहे. दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे, कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबरने राज्यात २०१ तर बीड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे २६ गुन्हे दाखल केले आहेत. अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सायबर विभाग यांच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. आजची तिसरी महत्त्वाची बातमी आहे, गेल्या अवघ्या १२ तासात राज्यात ११७ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता राज्यातील रुग्णांचा आकडा हा २८०१ एवढा झाला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे आतापर्यंत महाराष्ट्रात आढळून आले आहेत.  चौथी महत्त्वाची बातमी, जेव्हा या प्रकरणाची तीव्रता समोर आली तेव्हा पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ तपास सुरु केला. यावेळी पोलिसांना अशी माहिती मिळाली की, विनय दुबे नावाच्या एका व्यक्तीने व्हॉट्सअॅप व्हिडिओच्या माध्यमातून कामगारांना एकत्र येण्याचं अपली केलं होतं. पाचवी महत्त्वाची बातमी आहे, यंदा मान्सून सामान्य असेल. यावर्षी सरासरी इतका पाऊस पडणार असून जून ते सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या 96 ते 100 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. या सर्व बातम्या वाचूया सविस्तर. 

  1. देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, रुग्णांची संख्या 11,933 वर: देशात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. दररोज रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. देशात आज कोरोना रुग्णांची संख्या 11,933वर गेली आहे. तर 392 जणांचा मृत्यू झालाय. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  2. लॉकडाऊनच्या काळात राज्यात २०१ गुन्हे  तर बीड जिल्ह्यात २६ गुन्हे दाखल:  कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबरने राज्यात २०१ तर बीड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे २६ गुन्हे दाखल केले आहेत. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  3. राज्यात अवघ्या काही तासात सापडले ११७ नवे रुग्ण, पाहा आतापर्यंतचा आकडा काय: राज्यात अवघ्या १२ तासात ११७ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी ६६ हे मुंबईतील आहेत तर ४४ जण हे पुण्यातील आहेत.  सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  4. मुंबई पोलिसांनी अफवा पसरवणाऱ्याला केली अटक! : वांद्रे टर्मिनस प्रकरणातील अफवा पसरविणाऱ्या विनय दुबे याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. यासह १०० जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  5. कसा असेल यंदाचा पाऊस, हवामान विभागानं वर्तवला अंदाज: यावर्षी सरासरी इतका पाऊस पडणार असून जून ते सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या 96 ते 100 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. आयएमडीने यंदाच्या मान्सूनबाबत पहिला अंदाज व्यक्त केला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी