दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०४ एप्रिल २०२०: उद्धव ठाकरे संतापले ते राज्यात आढळले आणखी नवे रुग्ण

Headlines of the 4th april 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

Daily news
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०४ एप्रिल २०२०   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०४ एप्रिल २०२०: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे...  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. कोरोनाबाधितांची संख्या प्रत्येक दिवशी वाढताना दिसत आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी लोकांना संयमाचं आवाहन केलं, पण समाजात दुही माजवणाऱ्यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. दुसरी आजची महत्त्वाची बातमी म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी केंद्र सरकारसह नियम मोडणाऱ्या नागरिकांवर परखड भाष्य केलं आहे. तिसरी आजची महत्त्वाची बातमी आहे, यावर्षीची पूजाअर्चा, धार्मिक प्रार्थना सर्वांनी आपापल्या घरातच करावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वधर्मीय नागरिकांना केलं आहे. चौथी आजची महत्त्वाची बातमी म्हणजे राज्यातल्या लॉकडाऊनबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राजेश टोपे यांनी जनतेशी संवाद साधला. पाचवी आजची महत्त्वाची बातमी आहे, मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 537 वर पोहोचली आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा ही चिंताजनक बाब आहे. राज्यामध्ये रात्रभरात 47 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. या सर्व बातम्या सविस्तर वाचूया. 

  1. ...अशा विकृतींची गय केली जाणार नाही, उद्धव ठाकरे संतापलेः कोरोनाबाधितांची संख्या प्रत्येक दिवशी वाढताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी लोकांना संयमाचं आवाहन केलं.   सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  2. असल्यांना गोळ्या घालून ठार केलं पाहिजे, मरकजवर राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रियाः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी केंद्र सरकारसह नियम मोडणाऱ्या नागरिकांवर परखड भाष्य केलं आहे.   सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  3. पूजा-अर्चा, प्रार्थना घरातच करा, बाहेर पडाल तर कठोर कारवाई: अजित पवार : बहुतांश नागरिक घरात थांबून लढ्यात योगदान देत असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर फिरु नये, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  4. तरच कदाचित 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन मागे घेतलं जाईलः राजेश टोपे : राज्यातल्या लॉकडाऊनबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राजेश टोपे यांनी जनतेशी संवाद साधला.    सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 
  5. राज्यात आढळले आणखी नवे रुग्ण, दादरमध्येही कोरोनाचा शिरकाव:  मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 537 वर पोहोचली आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा ही चिंताजनक बाब आहे. राज्यामध्ये रात्रभरात 47 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.   सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी