दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०२ डिसेंबर २०१९: शरद पवारांचा गौप्यस्फोट ते सोन्याच्या दरात घसरण 

लोकल ते ग्लोबल
Updated Dec 02, 2019 | 21:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the 02 December 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

whole day news 02 December 2019 big headline sharad pawar sonia gandhi shiv sena rohit pawar devendra fadanvis bank holidays gold rate latest update 
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०२ डिसेंबर २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०२ डिसेंबर २०१९: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेसोबत काँग्रेसने सत्ता स्थापन करावी हे सोनियांना कसं पटवून दिलं याबाबत स्वत:च खुलासा केला तर दुसरी महत्त्वाची बातमी नवनिर्वाचित आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना मंत्री करण्यात यावं असे बॅनर झळकवण्यात आले आहेत. तर तिसरी महत्वाची बातमी म्हणजे भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी केलेला दावा चुकीचा असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

तर चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे, डिसेंबर महिन्यात बरेच बँक हॉलिडे असल्याने बँकेची कामं आताच आटपावी लागणार आहेत. तर पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे सोनं आणि चांदीच्या दरात आज मोठी घट झाल्याचं समोर आलं आहे. जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर... 

  1. खूप झाली चर्चा... सोनियाजी तीनच गोष्टी सांगतो, त्यानंतर शिवसेनेसाठी मिळाला होकार: शरद पवार: काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने शिवसेनेने सत्ता स्थापन केली. पण काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी नेमकं कसं तयार केलं याबाबत शरद पवार यांनी सांगितलं आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 
  2. 'पवार साहेब रोहितदादांना मंत्री करा', जागोजागी झळकले बॅनर: कर्जत-जामखेडचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांना मंत्री करण्यात यावं अशा आशयाचे फलक आता त्यांच्या मतदारसंघात झळकू लागले आहेत. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 
  3. भाजप खासदार धादांत खोटं बोलत आहे, देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण: भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ८० तासांसाठी झालेले मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी केंद्राचे ४० हजार कोटी वाचवले, असा दावा हेगडे यांनी केला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 
  4. Bank Holidays: डिसेंबर महिन्यात इतके दिवस असेल बँक बंद: 2019 वर्षांचा शेवटचा महिना सुरू झाला आहे. आज 1 डिसेंबर आहे. या वर्षीच्या शेवटच्या महिन्यात तुम्हांला पैशांची (कॅश) कमतरता पडू नये. तसंच तुमचं बँक संबंधित कामं रखडू नये यासाठी तुम्हांला आधीपासूनच प्लान करावा लागणार आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 
  5. Gold Rate Today, 02 December 2019: सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरातही घसरण: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची विक्री आणि थोक बाजारातील कमकुवत मागणीमुळे सोमवारी सोन्याचा दरात घसरण झाली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी