दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०४ नोव्हेंबर २०१९: पवारांची शिवसेनेला हिंट ते LIC चे 'हे' प्लॅन होणार बंद

Headlines of the 04 November 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

whole day news 04 november 2019 big headline vidhansabha election 2019 sharad pawar shivsena balasaheb thackeray sanjay raut devendra fadanvis amit shah toll lic latest update 
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०४ नोव्हेंबर २०१९:  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०४ नोव्हेंबर २०१९: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... शरद पवार यांनी दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीची चर्चा केली. त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेला एक हिंट देखील दिली. तर दुसरी महत्त्वाची बातमी बाळासाहेब ठाकरे हे लोकनेते होते. त्यांनी राजकारण केलं नाही. त्यांनी पक्ष वाढवला. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. तर तिसरी महत्वाची बातमी राज्यातील सत्तेबाबत झालेली कोंडी लक्षात घेऊन आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतली. 

तर चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे, केंद्र सरकारने येत्या १ डिसेंबरपासून देशभरात फास्टॅग सारखी इलेक्ट्रॉनिक टोल वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत दोन डझनपेक्षा जास्त वैयक्तिक विमा प्रोडक्ट रद्द करण्यात येणार आहेत. जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर... 

  1. [VIDEO] सत्ता स्थापनेसाठी अशी दिली शरद पवारांनी शिवसेनेला हिंट, पाहा पवार काय म्हणाले!: नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी थेट शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी अप्रत्यक्ष हिंटच दिली आहे. 'आपण शिवसेनेला पाठिंबा देणार का?' या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी एक प्रकारे शिवसेनेला हळूच हिंट देखील दिली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  2. बाळासाहेब ठाकरेंना राजकारण जमलं नाही, पाहा संजय राऊत असं का म्हणाले: 'बाळासाहेब ठाकरेंना राजकारण जमलं नाही उद्धव ठाकरे उत्तम राजकारण करतायत. बाळासाहेब ठाकरे लोकनेते होते त्यांनी राजकारण नाही केलं त्यांनी पक्ष वाढवला, लाखो शिवसैनिकांना ताकद दिली. पण त्यांनी ज्या प्रकारचं राजकारण अपेक्षित होतं ते केलं नाही त्यांनी मार्गदर्शक, नेता म्हणून काम केलं.' सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  3. अमित शहांसोबत ४० मिनिटांच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री म्हणाले...: आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास ४० मिनिटे चर्चा झाली. या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 
  4. वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी, १ डिसेंबरपासून लागू होणार 'हा' नियम:  केंद्र सरकारने येत्या १ डिसेंबरपासून देशभरात फास्टॅग सारखी इलेक्ट्रॉनिक टोल वसुली लागू करत आहे. वन नेशन वन फास्टॅग (one nation one fastag) या अंतर्गत वाहनांना फास्टॅग लावण्यात येणार आहेत. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 
  5. ३० नोव्हेंबरला LIC चे हे प्लान होताहेत बंद, त्यात तुमचा तर नाही ना...:  सार्वजनिक क्षेत्राची दिग्गज कंपनी भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत दोन डझनपेक्षा जास्त वैयक्तिक विमा प्रोडक्ट, ८ ग्रुप विमा प्लान (Insurance Plan) आणि ७ ते ८ रायडर्सला बंद करणार आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी