दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०६ ऑक्टोबर २०१९: मोदींचं उदयनराजेंना गिफ्ट ते परतीच्या पावसाचा तडाखा

Headlines of the 06 October 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...  

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या 

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • 'मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०६ ऑक्टोबर २०१९: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या संदर्भातली. सातारा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना एक चांगली बातमी मिळाली आहे. दुसरी बातमी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विधानसभा निवडणुकीपूर्वी एक वाईट बातमी मिळाली आहे. तिसरी बातमी आहे मुंबई महानगरपालिकेतील नोकर भरती बंद झाल्याच्या संदर्भातील. चौथी बातमी आहे टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर पहिल्या टेस्ट मॅचमध्ये मिळवलेल्या विजयाच्या संदर्भातील. पाचवी आणि शेवटची बातमी आहे परतीच्या पावसाने राज्यातील विविध भागात लावलेल्या जोरदार हजेरीच्या संदर्भातील.

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं उदयनराजेंना मोठं गिफ्ट: सातारा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या विक्रमी विजयासाठी पक्षाने जोरदार तयारी केली आहे. उदयनराजे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे साताऱ्यात येणार असल्याचं वृत्त समोर येत आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. प्रचारापूर्वी मनसेची मोठी अडचण: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या प्रचाराला लागले आहेत. मात्र, त्याच दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला प्रचारासाठी मैदानच मिळत नसल्याचं समोर आलं आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. मुंबई मनपातील नोकर भरती बंद: मुंबई महानगरपालिकेने नोकर भरती तात्पुरती बंद केल्याचं वृत्त समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई मनपा तोट्यात अल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळेच पालिकेतील नोकर भरती तात्पुरती बंद करण्यात आली आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  4. भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाने मोठा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर तब्बल २०३ रन्सने विजय मिळवला आहे. या विजयासोबतच टीम इंडियाने टेस्ट सीरिजमध्ये १-० ने आघाडी घेतली आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. परतीच्या पावसाचं थैमान! राज्यात वीज कोसळून ६ जणांचा मृत्यू: परतीच्या पावसाने राज्यातील विविध भागात जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे कुठे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे तर दुसरीकडे वीज कोसळून नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...