दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०७ ऑक्टोबर २०१९: भुसावळमध्ये हत्याकांड ते युती तुटली

Headlines of the 07 October 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...  

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या 

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • 'मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०७ ऑक्टोबर २०१९: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे आहे महाराष्ट्राला हादरवणारी. जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये भाजप नगरसेवकासह पाच जणांची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुसरी बातमी आहे महायुतीमधील महत्वाचे दोन पक्ष असलेल्या शिवसेना भाजपचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात रिंगणात उतरले आहेत. तिसरी बातमी आहे कर्जत जामखेड मतदारसंघातील रोहित पवार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याच्या संदर्भातील. चौथी बातमी आहे मनसे उमेदवार प्रचारा दरम्यान थेट शिवसेनेच्या शाखेत दाखल झाल्याचा फोटो व्हायरल झाल्याच्या संदर्भातील. पाचवी आणि शेवटची बातमी आहे सुनेनेच आपल्याच कुटुंबातील सहा जणांची हत्या केल्याची. 

  1. भाजप नगरसेवकासह ५ जणांची हत्या: जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये सामूहिक हत्याकांडाची धक्कादायक घटना उघडकीस आळी आहे. या हत्याकांडात भाजपच्या नगरसेवकासह त्याच्याच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  2. अखेर युती तुटली, 'या' मतदारसंघात शिवसेना-भाजपत रंगणार 'सामना': विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र निवडणुकीच्या रिंगणात आहेत मात्र, असे असतानाही कोकणातील कणकवली मतदारसंघात भाजप उमेदवाराच्या विरुद्ध शिवसेनेने आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  3. रोहित पवार यांचा अर्ज बाद, पण...: कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून रोहित पवार यांचा अर्ज बाद झाला आहे. मात्र, हे रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू नाहीत तर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले रोहित पवार आहेत. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  4. प्रचारादरम्यान मनसेचा उमेदवार शिवसेना शाखेत पोहोचला: डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार मंदार हळबे हे शिवेसना शाखेत पोहोचल्याचा एक फोटो व्हायरल होत आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. घरच्या सुनेनेच केली सहा जणांची हत्या: केरळमधील एकाच कुटुंबातील सहा जणांच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. या हत्या प्रकरणामागे नेमका कोणाचा हात होता हे आता उघड झालं आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...