दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १ मार्च २०२०:  दात घशात जातील ते ...जरा हिशोबात राहा

Headlines of the 1 March 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर... 

whole day news 1 march 2020 big headline ncp bjp rupali chakankar chitra wagh shaheen bagh 144 act amit shah 6 baby born latest update 
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १ मार्च २०२०:  दात घशात जातील ते ...जरा हिशोबात राहा    |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १ मार्च २०२०: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधात चित्रा वाघ यांनी तुमचे दात जास्त दिसत आहेत. कधी घशात जातील याचा नेम नाही. असं ट्वीट केलं आहे. तर दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे चित्रा वाघ यांच्या याच टीकेला रुपाली चाकणकर यांनीही तात्काळ प्रत्युत्तर दिलं आहे. कशासाठी पक्ष सोडला हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आता पळता भुई कमी होई, जरा हिशोबात राहा असं चित्रा वाघ यांना सुनावलं आहे. तिसरी महत्वाची बातमी म्हणजे गेल्या दोन महिन्यापासून ज्या शाहीन बागेत सीएए विरुद्ध आंदोलन सुरु आहे तिथे आता कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. 

तर चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे कोलकाता येथे अमित शहा यांच्या एका जाहीर सभेत पिस्तुल घेऊन घुसणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. तर पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे मध्यप्रदेशमध्ये एका २३ वर्षीय महिलेने तब्बल सहा मुलांना जन्म दिल्याची घटना घडली आहे. जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर.  

  1. तुमचे दात जास्तच दिसताहेत, कधी घशात जातील याचा नेम नाही: चित्रा वाघ:  राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यात पुन्हा एकदा जुंपली आहे. यावेळी दोघीनींही ट्विटरवरुनच एकमेकींना लक्ष्य केलं आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  2. 'चित्रा वाघ जरा हिशोबात', रुपाली चाकणकरांचा इशारा: राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर आणि भाजपच्या चित्रा वाघ यांच्यातील तू-तू-मै-मै अजिबात थांबताना दिसत नाही. 'तुमचे दात जास्तचं दिसताहेत ते सांभाळून ठेवा कधी घशात जातील याचा नेम नाही.' असं ट्वीट करुन चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला होता. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  3. हिंदू सेनेच्या धमकीनंतर शाहीन बागमध्ये जमावबंदी लागू, आंदोलन संपणार?:  दिल्लीच्या शाहीन बागेत रविवारी सकाळपासूनच कलम १४४ लागू करण्यात आलं असून मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. यावेळी पोलिसांकडून शाहीन बागेत एक बॅनरही लावण्यात आलं आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  4. अमित शहांच्या सभेत पिस्तुल घेऊन घुसण्याचा प्रयत्न: अमित शहा यांच्या सभेदरम्यान, जेव्हा लोकं मैदानात जात होते, तेव्हा सुरक्षा कर्मचार्‍यांसमोर एक अशी घटना घडली की, ज्यामुळे सर्व जण अलर्ट झाले. या सभेसाठी व्हीआयपी गेटमधून आलेल्या एका व्यक्तीकडून ९ एमएमची पिस्तूल सापडली. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  5. OMG: २३ वर्षीय महिलेने दिला तब्बल ६ मुलांना जन्म: मध्य प्रदेशमधील श्योपूर जिल्ह्यात एका २३ वर्षीय महिलेने काल (शनिवार) तब्बल ६ मुलांना जन्म दिला आहे. मात्र, त्यानंतर लगेचच दोन नवजात मुलांचा मृत्यू झाला. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी