दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १० ऑक्टोबर २०१९: राज ठाकरेंची मागणी ते आदित्य ठाकरेंची बिचुकलेवर प्रतिक्रिया

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 10, 2019 | 21:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the 10 October 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या 

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १० ऑक्टोबर २०१९: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मुंबईत पहिली प्रचारसभा पार पडली. या जाहीरसभेत राज ठाकरेंनी मतदारांकडे एक वेगळीच मागणी केली. दुसरी बातमी आहे अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या संदर्भातील. तिसरी बातमी आहे खड्ड्यांमुळे एका तरुणीचा बळी घेतल्याची. चौथी बातमी आहे चंद्रकांत पाटील यांच्या बाईक रॅलीत वाहतूक नियमांचं उल्लंघन झाल्याची. पाचवी आणि शेवटची बातमी आहे आदित्य ठाकरेंनी बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेंवर दिलेल्या प्रतिक्रियेची.

  1. राज ठाकरेंना सत्ता नाही तर हवाय विरोधी पत्ता: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पहिली प्रचारसभा मुंबईतील सांताक्रुझ परिसरात पार पडली. या जाहीर सभेत राज ठाकरेंनी मतदारांकडे अशी काही मागणी केलीय जी आजपर्यंत कुठल्याच राजकीय पक्षाने केली नाहीये. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. मी आजवर फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री पाहिला नाही- अमित शहा: भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सांगलीत एक जाहीर सभा घेतली. या सभेत अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंड भरुन कौतुक केलं आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. खड्ड्यांनी घेतला तरुणीचा बळी, महिन्याभरात होतं लग्न: ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत एका तरुणीचा खड्ड्यांमुळे बळी गेला आहे. या तरुणीचं महिन्याभरात लग्न होतं आणि या लग्नाच्या शॉपिंगहून परतताना तिच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात तिचा मृत्यू झाला. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  4. चंद्रकांत पाटील यांच्या बाईक रॅलीत नियमांची ऐशीतैशी, पोलीस करणार कारवाई: आगामी विधानसभेसाठी पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांनी बाईक रॅली काढली. या बाईक रॅलीत वाहतूकीच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं समोर आलं असून आता पोलीस कारवाई करणार आहेत. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. अभिजीत बिचुकलेंबाबत आदित्य म्हणाले: वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढत आहेत. आदित्य ठाकरेंविरुद्ध बिग बॉस स्पर्धक अभिजीत बिचुकले सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहे. याच बिचुकलेंबाबत आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरेंनी काय म्हटलं हे पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी