दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ११ जानेवारी २०२०: तारापूर MIDCमध्ये स्फोट ते साहित्य संमेलनात राडा 

Headlines of the 11 January 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर... 

whole day news 11 January 2020 big headline tarapur midc blast sahitya sammelan mess caa balasaheb thorat kerla building deepika padukon latest update 
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ११ जानेवारी २०२०: तारापूर MIDCमध्ये स्फोट ते साहित्य संमेलनात राडा   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ११ जानेवारी २०२०: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... तारापूर एमआयडीसीमधील एका कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटात ४ ते ५ जणांचा मृत्यू झाल आहे. तर दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आज व्यासपीठावर आज जोरदार गोंधळ पाहायला मिलाला. तर दुसरीकडे याचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारालाच पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचं समोर आलं आहे. तिसरी महत्वाची बातमी म्हणजे काँग्रेसचे नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी असं म्हटलं आहे की, सीएएची अधिसूचना जारी झाली असली तरीही राज्यात हा कायदा लागू केला जाणार नाही. 

तर चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे, केरळमध्ये सध्या बेकायदा बांधकामांवर मोठी कारवाई केली जात. अशाच एका कारवाईत एक इमारत क्षणात जमीनदोस्त झाली आहे. ज्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात शूट करण्यात आला आहे. तर पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे छपाक सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर आता याबाबत अनेक अडचणींना निर्मात्यांना सामोरं जावं लागत आहे. जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर... 

  1. तारापूर MIDC मध्ये भीषण स्फोट, स्फोटामुळे कंपनीच्या बाजूची इमारतच कोसळली; ३ ते ४ जणांचा मृत्यू:  पालघर जिल्ह्यातील कोलवडे गावानजीक तारापूर औद्योगिक क्षेत्रातील (एमआयडीसी) एका रासायनिक कंपनीत भीषण स्फोट झाला असून यामुळे जवळजवळ १० किमीपर्यंतचा परिसरला हादरला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 
  2. [VIDEO] साहित्य संमेलनात गोंधळ, पोलिसांची पत्रकाराला जोरदार धक्काबुक्की: ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्याच दिवशी मुख्य व्यासपीठावर प्रचंड मोठा राडा पाहायला मिळाला. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 
  3. अधिसूचना जारी झाली तरी महाराष्ट्रामध्ये CAA लागू करणार नाही: बाळासाहेब थोरात: 'नागरिकत्व सुधारणा विधेयक  (CAA) कायद्याची अधिसूचना काल (दिनांक १० जानेवारी) पासून देशात लागू करण्यात आला असला तरी आम्ही पहिल्यापासून या कायद्याचा विरोध करतं असून आमचा विरोध कायम राहणार आहे.' सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 
  4. एका क्षणात जमीनदोस्त झाली अवैध इमारत, बघा व्हिडिओ: केरळमध्ये बेकायदा बांधकामांवर मोठी कारवाई केली जात आहे. राज्यातील मरादूतील बहुमजली अवैध इमारती पाडण्याच्या कारवाईसंदर्भात कारवाई करण्यात आली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 
  5. दीपिका पदुकोणच्या 'छपाक'ला पुन्हा झटका, कोर्टाचे आदेश पाळले नाही तर होणार हे परिणाम: बॉलिवूड एक्ट्रेस दीपिका पदुकोणचा सिनेमा छपाक 10 जानेवारीला रिलीज झाला. या सिनेमाबद्दल बरेच वाद होताना दिसत आहेत. दीपिकाच्या अडचणी काही संपताना दिसत नाही आहेत. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी