दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ११ मे २०२०: 'या' जिल्ह्यात ६१ नवीन रुग्ण ते महाराष्ट्रासाठी गुड न्यूज 

Headlines of the 11 May 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

whole day news 11 may 2020 big headline railway aurangabad patients lockdown rape case maharahstra latest update 
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ११ मे २०२०: 'या' जिल्ह्यात ६१ नवीन रुग्ण ते महाराष्ट्रासाठी गुड न्यूज   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ११ मे २०२०: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... देशात उद्यापासून रेल्वे सेवा काही प्रमाणात सुरु होणार आहे. १५ प्रवासी रेल्वे चालवल्या जाणार आहे.
दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे राज्यातील एका मोठ्या जिल्ह्यात अवघ्या सकाळपासून काही तासात ६१ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तिसरी महत्वाची बातमी देशात लॉकडाऊन ४.० लागू होणार की नाही? याबाबतचे संकेत आज मिळण्याची शक्यता आहे. 

तर चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे योगा शिकण्यासाठी आलेल्या एका जपानी महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. तर पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे राज्यात विदेशी गुंतवणूक यावी यासाठी वाटाघाटी सुरू झाल्या आहेत.  जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर.

  1. IRCTC Train Booking:आजपासून सुरु होणार रेल्वे बुकिंग: तब्बल ५० दिवसांनंतर देशात प्रवासी वाहतूक रेल्वे सुरु होणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने या संदर्भातील माहिती दिली. १२ मे पासून १५ प्रवासी रेल्वे (परतीच्या फेऱ्या मिळून ३०) चालवल्या जाणार आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  2. 'या' जिल्ह्यात सकाळपासून ६१ नवीन रुग्ण,आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू: औरंगाबादेत आज (सोमवार) सकाळी ४३ नव्या रुग्णांची भर पडल्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्ण ६०२ झाले होते. त्यात आणखी १७ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे औरंगाबादेतील कोरोना बाधितांचा आकडा ६१९ वर गेला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  3. देशात लॉकडाऊन ४.० होणार?: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. ही चर्चा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे. चर्चेअंती देशात १७ मे नंतर लॉकडाऊन आणखी पुढे सुरू राहणार की, शिथील होणार? हे समजणार आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  4. जपानी महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, तीन योगा प्रशिक्षकांना अटक: एका जपानी महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही महिला योगनगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या ऋषिकेश येथे योगा शिकण्यासाठी आली होती. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  5. महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, इतक्या कंपन्यांतील उत्पादन सुरू: कोरोना संकटामुळे जगभरातील उद्योग, व्यापार ठप्प आहेत. राज्यावरदेखील याचा विपरित परिणाम झाला आहे. असे असले तरी उद्योग विभागाने ठोस पावलं उचलल्याने उद्योग क्षेत्र पूर्वपदावर येत आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी