दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ११ ऑक्टोबर २०१९: निवडणुकीपूर्वी व्हायरल होणारा मेसेज ते कांद्यावरुन हाणामारी

Headlines of the 11 October 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या 

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ११ ऑक्टोबर २०१९: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... सध्या राज्यभर निवडणुकांचं वातावरण आहे आणि या निवडणुकीपूर्वी एक मेसेज व्हायरल होत आहे. दुसरी बातमी आहे रशियन महिलेवर बलात्कार करुन गर्भपात केल्या प्रकरणी मुंबईतील पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची. तिसरी बातमी आहे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर अपघात होता-होता टळला त्याच्या संदर्भातील. चौथी बातमी आहे प्रचारसभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाची. पाचवी आणि शेवटची बातमी आहे कांद्यावरुन तुफान हाणामारी झाल्याच्या संदर्भात.

  1. मतदानापूर्वी व्हायरल होतोय मेसेज: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. येत्या २१ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदानापूर्वी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सोशल मीडियात एक मेसेज खूपच व्हायरल होत आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. रशियन महिलेवर बलात्कार: मुंबईतील एका पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करण्यात आला असून त्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एका रशियन महिलेवर सलग १२ वर्षे बलात्कार करुन तिचा गर्भपात केल्याचा आरोप या पोलीस अधिकाऱ्यावर करण्यात आलाय. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरची चाके चिखलात रुतली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला पुन्हा एकदा अपघात होता-होता टळला आहे. रायगड जिल्ह्यातील पेण येथे प्रचारसभेसाठी पोहोचलेल्या मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरची चाके चिखलात रुतली. यानंतर प्रसंगावधान दाखवत पायलटने हेलिकॉप्टरवर नियंत्रण मिळवलं. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  4. ... तर बांबू बसेल- राज ठाकरे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भांडुपमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी मुंबईत जर चौथी भाषा आणायचा प्रयत्न केला तर बांबू बसेल असं ठणकावलं आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. कांद्यावरुन तुफान हाणामारी: कांद्याचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. आता कांद्यावरुन थेट हाणामारी होत असल्याचं पहायला मिळत आहे. उत्तरप्रदेशातील अमरोहा येथे कांद्यावरुन महिलांमध्ये हाणामारी झाली असून पाच महिला जखमी झाल्या आहेत. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी