दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १२ जानेवारी २०२०: दहशतवाद्यांसोबत पोलीस अधिकारी अटक ते दूध महागलं 

Headlines of the 12 January 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर... 

whole day news 12 January 2020 big headline police officer bjp book sahitya sammelan sushilkumar shinde trapur blast milk rate latest update 
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १२ जानेवारी २०२०  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १२ जानेवारी २०२०: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला हिज्बुल मुजाहिद्दीन आणि लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांसोबत पकडण्यात आलं आहे. तर दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे आज के शिवाजी -नरेंद्र मोदी हे पुस्तक भाजपच्या एका नेत्याने प्रकाशित केलं आहे. ज्यावर आता जोरदार टीका सुरु झाली आहे. तिसरी महत्वाची बातमी म्हणजे कर्नाटकमध्ये इंग्रजी साहित्य कथा वाचली जातात मात्र मराठी भाषेचा इतका तिरस्कार काही मंडळी का करतात. असा सवाल माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी विचारला आहे. 

तर चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे, तारापूर एमआयडीसीमधील कंपनीत झालेल्या स्फोटात जवळजवळ ७ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. तर पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे आजपासून दुधाचे दर वाढविण्यात आले आहेत. दुधाच्या विक्री दरात पुन्हा दोन रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर... 

  1. हिज्बुलच्या दहशतवाद्यांसोबत सापडला राष्ट्रपती पदक विजेता पोलीस अधिकारी: जम्मू काश्मीरचा एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला हिज्बुल मुजाहिद्दीन आणि लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांसोबत पकडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या पोलीस अधिकाऱ्याला दहशतवांद्यासोबत एका कारमध्ये पकडलं आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  2. ‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ पुस्तकाचं प्रकाशन, संजय राऊतांची भाजपवर जोरदार टीका: छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही असं नेहमी म्हटलं जातं. मात्र, भाजपच्या एका नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी महाराजांशी तुलनाच केलेली नाही तर तशा आशयाचं पुस्तकचं छापल्याचं समोर आलं आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  3. मराठी भाषेचा इतका तिरस्कार कशासाठी, सुशीलकुमार शिंदे यांचा सवाल: कर्नाटकमध्ये इंग्रजी साहित्य कथा वाचली जातात मात्र मराठी भाषेचा इतका तिरस्कार काही मंडळी का करतात. हा तर खरा चिंतनाचा विषय आहे, असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलं आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  4. तारापूर स्फोटातील मृतांचा आकडा सातवर, मृतांमध्ये कंपनीचा मालकही: पालघर जिल्ह्यातील कोलवडे गावानजीक तारापूर औद्योगिक क्षेत्रातील (एमआयडीसी) एका रासायनिक कंपनीत भीषण स्फोट झाला. या भीषण स्फोटातील मृतांची संख्या आता 7 वर पोहोचली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  5. महागलं! आजपासून दूध महागलं... जाणून घ्या काय असेल दुधाची किंमत: आजपासून सामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. राज्यात नववर्षालाच नागरिकांना दूध दरवाढीचा सामना करावा लागेल. राज्यात दुधाच्या विक्री दरात पुन्हा दोन रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी