दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १२ जुलै २०१९: मराठा आरक्षण ते शिवानी सुर्वेची पुन्हा एंट्री

लोकल ते ग्लोबल
Updated Jul 12, 2019 | 22:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर... 

divasbharatil batmya
दिवसभरातील ५ बातम्या 

मुंबई: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात. मराठा आरक्षणाबाबतच्या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने तूर्तास स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा समाज तसेच राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तुळशी तलाव पाण्याने काठोकाठ भरला आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी नक्कीच ही खुशखबर आहे. कोकणात पावसाचा जोर काही कमी होत नाही आहे. यामुळे येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मराठी बिग बॉस २च्या घरात अभिनेत्री शिवानी सुर्वेची पुन्हा एंट्री होत आहे. शनिवारच्या एपिसोडमध्ये शिवानी खेळताना दिसेल अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धोनीा सातव्या क्रमांकावर फलंदाजीस का पाठवले याचा खुलासा अखेर झाला आहे. 

  1. Maratha Reservation Case: मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नाही, राज्य सरकारला दिलासा - मराठा आरक्षणाच्या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यात येणार नाही असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला आहे. तसेच राज्य सरकारलाही हा मोठा दिलासा आहे. यासोबतच सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला नोटीस पाठवत दोन आठवडयात यावर उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. यावर दोन आठवड्यानंतर सुनावणी केली जाणार आहे. वाचा संपूर्ण बातमी
  2. मुंबईकरांसाठी गुडन्यूज! तुळशी तलाव ओव्हरफ्लो - मुंबईला पाणी पुरवठा करणारा तुळशी तलाव पाण्याने काठोकाठ भरला आहे. गुरूवारी सकाळी हा तलाव काठोकाठ भरला. या तलावात ९७.२० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. या तलावातून मुंबईकरांना पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मान्सूनने चांगलीच हजेरी लावली होती. तलाव क्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने तलाव भरला आहे. यामुळे मुंबईकरांसाठी नक्कीच ही सुखावणारी बातमी आहे. वाचा सविस्तर बातमी
  3. कोकणात पावसाचा जोर कायम; मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक बंद  - मुंबईत पावसाचा जोर ओसरला असला तरी कोकणात मात्र पावसाचा जोर अद्याप कायम आहे. कोकणातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. याचा परिणाम वाहतुकीवर पाहायला मिळत आहे. तसेच खबरदारी म्हणून मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी पूलही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. यासोबतच पुलाजवळ सुरक्षाही तैनात करण्यात आली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
  4. बिग बॉस मराठी घरात शिवानी सुर्वेची होणार पुन्हा एन्ट्री - मराठी बिग बॉस २च्या घरात स्पर्धक शिवानी सुर्वेची पुन्हा एकदा एंट्री होत आहे. शिवानी सुर्वे जेव्हा घरात आली होती तेव्हापासून तिला बरं वाटत नव्हत. याची तिने बिग बॉसला माहितीही दिली होती. नंतर काही दिवसांनी तिने बिग बॉसलाच धमकी दिल्याने तिला घरातून बाहेर काढण्यात आले होते. आता ती पुन्हा घरात खेळ खेळताना दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ती उद्यापासूनच्या एपिसोडमध्ये दिसेल. संपूर्ण बातमी वाचा 
  5. झाला खुलासा, सेमीफायनलमध्ये धोनीला सातव्या क्रमांकावर पाठवण्याचा कोणी दिला होता सल्ला - आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधील न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलच्या सामन्यातील पराभव साऱ्यांच्याच जिव्हारी लागला आहे. त्यातच धोनीला सातव्या क्रमांकावर खेळण्यास का पाठवले असा प्रश्नही या पराभवाच्या निमित्ताने केला जातोय. या प्रश्नाचा अखेर खुलास झाला आहे. बॅटिंग कोच बांगर यांच्या सल्ल्यावरून धोनीला सातव्या क्रमांकावर खेळण्यास पाठवले असल्याची माहिती मिळाली आहे. सविस्तर वाचा


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १२ जुलै २०१९: मराठा आरक्षण ते शिवानी सुर्वेची पुन्हा एंट्री Description: Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर... 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
भारतीय सैन्याची मोठी कारवाई, PoKमधील दहशतवादी तळं उद्धवस्त 
भारतीय सैन्याची मोठी कारवाई, PoKमधील दहशतवादी तळं उद्धवस्त 
रुग्णासोबत डॉक्टर महिलेचे शारीरिक संबंध, नंतर रुग्णावरच केला बलात्काराचा आरोप 
रुग्णासोबत डॉक्टर महिलेचे शारीरिक संबंध, नंतर रुग्णावरच केला बलात्काराचा आरोप 
[VIDEO]: महिलेला बेदम मारहाण, निर्वस्त्र करुन गावात फिरवलं
[VIDEO]: महिलेला बेदम मारहाण, निर्वस्त्र करुन गावात फिरवलं
PHOTOS: 'ती'  निवडणूक अधिकारी पुन्हा चर्चेत, विधानसभा निवडणुकीत सेल्फी
PHOTOS: 'ती'  निवडणूक अधिकारी पुन्हा चर्चेत, विधानसभा निवडणुकीत सेल्फी
[VIDEO]: हुबळी रेल्वे स्थानकात स्फोट, एक जण जखमी
[VIDEO]: हुबळी रेल्वे स्थानकात स्फोट, एक जण जखमी
लिव-इनमधील गर्लफ्रेंडच्या प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी तरुणाने केलं असं काही की, तुम्हीही व्हाल हैराण
लिव-इनमधील गर्लफ्रेंडच्या प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी तरुणाने केलं असं काही की, तुम्हीही व्हाल हैराण
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० ऑक्टोबर २०१९: धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल ते पंकजांची पहिली प्रतिक्रिया
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० ऑक्टोबर २०१९: धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल ते पंकजांची पहिली प्रतिक्रिया
'निवडणुका असल्यावरच पाकिस्तानबाबत सर्जिकल पॅटर्न का होतो?' काँग्रेस नेत्याचा सवाल
'निवडणुका असल्यावरच पाकिस्तानबाबत सर्जिकल पॅटर्न का होतो?' काँग्रेस नेत्याचा सवाल