दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १२ ऑक्टोबर २०१९: पंतप्रधान मोदींची स्वच्छता ते अमीषा पटेलविरुद्द अटक वॉरंट

Headlines of the 12 October 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या 

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १२ ऑक्टोबर २०१९: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनवाणी चालत समुद्र किनाऱ्याची स्वच्छता केल्याची. दुसरी बातमी आहे शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत आपला वचननामा प्रसिद्ध केला असून त्यात जनतेसाठी आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. तिसरी बातमी आहे उदयनराजे भोसले हे प्रचारसभेत चांगलेच संतापल्याचं पहायला मिळालं. चौथी बातमी आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाच्या संदर्भातील. पाचवी आणि शेवटची बातमी आहे बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलविरुद्ध न्यायालयाने काढलेल्या अटक वॉरंटची.

  1. मोदींनी केली समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता: पंतप्रधान मोदींनी शनिवारी सकाळी तामिळनाडूतील महाबलीपुरमच्या समुद्र किनाऱ्यावर स्वच्छतेचा संदेश दिला आहे. यावेळी मोदींनी समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता केली आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  2. शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने आपला वचननामा जाहीर केला आहे. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी वचननामा प्रसिद्ध केला आहे. या वचननाम्यात आश्वासनांची खैरात करण्यात आली आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. उदयनराजे संतापले आणि म्हणाले, 'असं वाटतं एक कानाखाली द्यावी': पाटण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शंभूराज देसाई यांच्या प्रचारसभेत उदयनराजे चांगलेच संतापले. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  4. माझ्या भाषणावर टाळी ऐवजी 'त्याच्या' गालावर टाळी द्यायला हवी होती: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भिवंडीत एक जाहीर सभा पार पडली. यावेळी राज ठाकरेंनी शिवसेना-भाजप सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  5. अभिनेत्री अमीषा पटेलविरुद्ध अटक वॉरंट: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अमीषा पटेल अडचणीत आली आहे. कारण एक चेक बाउंस प्रकरणात न्यायालयाने अमीषा पटेलविरुद्ध अटक वॉरंट काढलं आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी