दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १३ ऑगस्ट २०१९: पूरग्रस्तांसाठी ६००० कोटींची मदत ते धोनीने लपवले मोठे गुपीत

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 13, 2019 | 21:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

big headline jabardast 5 news day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या  

मुंबई: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात. आजच्या दिवसभरातील पहिली बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या संदर्भातील. राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. राज्यातील विविध जिल्ह्यांत झालेल्या पूरस्थितीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने सहा हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. दुसरी बातमी आहे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेता रितेश देशमुख याने केलेल्या मदतीची. अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांनी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मदत केली आहे. तिसरी बातमी आहे बहिण आणि भावाच्या संदर्भातील. रक्षाबंधनाचा सण जवळ आला आहे मात्र, त्यापूर्वीच एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. चौथी बातमी आहे उल्ल्हासनगरमध्ये इमारत कोसळली त्या संदर्भातील. पाचवी बातमी आहे टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याच्यासंदर्भातील.

  1. पूरग्रस्तांसाठी ६,००० कोटींची मदत: यंदाच्या वर्षी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली. तर काही जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. राज्यातील पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने सहा हजार कोटींच्या निधीची घोषणा केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याचा निर्णय घेण्यात आला आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  2.  रितेश-जेनेलियाची पूरग्रस्तांना मदत: अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया यांनी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना एक मोठी मदत केली आहे. रितेश आणि जेनेलिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे २५ लाख रुपये मदतनिधीचा चेक सुपूर्द केला. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. भावाने बहिणीचे डोळे फोडले: बहिणीने १०० रुपयांचा ड्रेस खरेदी केला म्हणून तिच्या भावाने तिला मारहाण केली. इतकचं नाही तर भावाने तिचे डोळे फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी भाऊ हा बहिणीपेक्षा तीन वर्षांनी लहान आहे. दिल्लीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  4.  उल्हासनगरमध्ये इमारत कोसळली: उल्हासनगरमध्ये मंगळवारी सकाळी एक पाच मजली इमारत कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. सोमवारीच ही इमारत रिकामी करण्यात आली होती आणि त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. उल्हासनगरमधील लिंक रोड भागात महक नावाची ही इमारत होती. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. धोनीने लपवले मोठे गुपीत: टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी सध्या भारतीय लष्करात आपली सेवा देत आहे. या सेवेदरम्यान धोनीने आपल्याबद्दल कमालीची गुप्तता राखली. पाहा काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि धोनीने कशाबाबत गुप्तता राखली होती. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी