दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १३ जानेवारी २०२०: शिवेंद्रराजे संतापले ते "कार नाही सर'कार' चालवतोय"

लोकल ते ग्लोबल
Updated Jan 13, 2020 | 21:33 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Headlines of the 13 January 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या 

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १३ जानेवारी २०२०: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज  दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... पंतप्रधान नरेंद्र मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुलनेवर शिवेंद्रराजे संतापले. दुसरी बातमी आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला आहे. तिसरी बातमी आहे मुंबईतील टॅक्सीबाबत राज्य सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. चौथी बातमी आहे तिहार जेलमध्ये निर्भयाच्या गुन्हेगारांच्या डमीला फाशी. पाचवी आणि शेवटची बातमी आहे आता व्हीआयपी सुरक्षेतून एनएसजी कमांडोंना मुक्त करण्याच्या संदर्भातील. 

  1. मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुलनेवर शिवेंद्रराजे संतापले: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करणाऱ्या पुस्तकावरुन छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शिवेंद्रराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  2. तीनचाकी कार नाही पण सर'कार' चालवतोय-उद्धव ठाकरे: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला आहे. मला दुचाकी चालवायची सवय नाही आता तीन चाकी कार नाही पण सरकार चालवतोय असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  3. मुंबईतील टॅक्सीबाबत राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय: मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सींवर आता तीन रंगाचे दिवे लावण्याचा निर्णय राज्याच्या परिवहन विभाघाने घेतला आहे. या संदर्भातील सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.  
  4. निर्भयाच्या गुन्हेगारांच्या डमीला फाशी: तिहार जेलमध्ये निर्भयाच्या गुन्हेगारांच्या डमीला फाशी दिली असल्याची माहिती तुरुंगातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. डमीला रविवारी फाशी दिली गेली. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  5. व्हीआयपी सुरक्षेतून एनएसजी कमांडो होणार मुक्त: केंद्र सरकारने व्हीआयपी सुरक्षेत तैनात असणाऱ्या एनएसजी कमांडोजना पूर्णपणे मुक्त करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर ही सुरक्षा ड्युटी निमलष्करी दलाला सोपवली जाणार आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी