दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १४ ऑगस्ट २०१९: विंग कमांडर अभिनंदन यांना वीर चक्र ते सोनं झालं स्वस्त

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 14, 2019 | 22:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

jabardast 5 news day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या 

मुंबई: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात. आजच्या दिवसभरातील पहिली बातमी आहे ती म्हणजे भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांच्या सन्मानाची. विंग कमांडर अभिनंदन यांना वीर चक्राने सन्मानित करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनी अभिनंदन यांचा हा सन्मान करण्यात येणार आहे. दुसरी बातमी आहे जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्याच्या संदर्भातील. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर एमआयएमचे असादुद्दीन ओवैसी चांगलेच संतापल्याचं दिसत आहे. ओवैसी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. तिसरी बातमी आहे भारत-पाकिस्तान संबंधांच्या बाबतीत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला एक धमकी दिली आहे. पाकिस्तानी लष्कर पूर्णपणे तयार आहे तसेच पाकिस्तानची जनता सुद्धा युद्धासाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. चौथी बातमी आहे महाराष्ट्रात आलेल्या पूर परिस्थितीनंतर होणाऱ्या मदती संदर्भातील. पाचवी आणि शेवटची बातमी आहे सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीच्या संदर्भातील.

  1. विंग कमांडर अभिनंदन यांना वीर चक्र: भारतीय सैन्याने पाकिस्तानवर केलेल्या एअरस्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानने एफ-१६ विमानाने भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी केली. पाकिस्तानच्या या विमानाला पाडून इतर विमानांना पिटाळून लावणाऱ्या भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांना वीर चक्र पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिनी अभिनंदन यांचा सन्मान केला जाणार आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. कलम ३७० रद्द केल्यानंतर संतापले ओवैसी: जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर असादुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. मोदी सरकारला काश्मीरवर प्रेम आहे मात्र तेथे राहणाऱ्या काश्मिरी नागरिकांवर प्रेम नाही असं ओवैसी यांनी म्हटलं आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. इम्रान खान यांची धमकी: जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचे नेते, सेलिब्रिटी चांगलेच भांबावल्याचं दिसत आहे. आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला युद्धाची धमकी दिली आहे. काश्मीरबाबत निर्णय घेऊन मोदी सरकारने रणनैतिक चूक केली आहे. पाकिस्तानचं लष्कर युद्धासाठी तयार आहे असंही इम्रान खान यांनी म्हटलं आहे. सविस्तर वृत्तासाठी या लिंकवर क्लिक करा.
  4. पूरग्रस्तांसाठी लालबागचा राजा मंडळाची अवघ्या इतक्या लाखांचीच मदत: महाराष्ट्रात आलेल्या पूर परिस्थितीनंतर सर्वच स्तरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सुद्धा राज्यातील पूरग्रस्तांना मदत केली आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. सोन्याच्या दरात घसरण: गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात होणारी वाढ थांबली आहे. सोन्याच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता मात्र, बुधवारी सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पहायला मिळालं. सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १४ ऑगस्ट २०१९: विंग कमांडर अभिनंदन यांना वीर चक्र ते सोनं झालं स्वस्त Description: Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...