दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १४ मे २०१९: अमित शहांच्या रोड शोमध्ये जाळपोळ ते काँग्रेस आमदाराची शिवीगाळ

लोकल ते ग्लोबल
Updated May 14, 2019 | 21:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the day: आज दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या. या पैकी महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा फक्त एका क्लिकवर...

whole day news 14 may 2019 big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या 

मुंबई: आज दिवसभरात विविध घटना घडल्या आहेत. या घटनांपैकी दिवसभरातील महत्वाच्या अशा काही घटना आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून. आजच्या दिवसातील पहिली बातमी आहे भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान मोठा राडा झाला. यानंतर चक्क दगडफेक आणि जाळपोळ झाल्याचं पहायला मिळालं. यानंतर अमित शहा यांना आपला रोड शो थांबवावा लागला आहे. दुसरी बातमी आहे भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवल्याने प्राध्यापकाला निलंबित करण्यात आल्याची. तिसरी बातमी आहे दुष्काळाच्या संदर्भातील. महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती खूपच गंभीर आहे. यामुळेच पाणी टंचाईच्या विषयावर आयोजित बैठकीत काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली आहे. चौथी बातमी खूपच धक्कादायक आहे. मुंबईतील सायन रुग्णालयात एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. तर, पाचवी बातमी आहे क्रिकेटच्या मैदानातून.

  1. अमित शहांच्या रोड शोमध्ये दगडफेक, जाळपोळ: लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान १९ मे रोजी होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा जोर वाढवला आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी कोलकातामध्ये रोड शो आयोजित केला होता. या दरम्यान तेथे दगडफेक आणि जाळपोळ झाल्याचं पहायला मिळालं. सविस्तर वृत्त आणि व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. भाजपच्या विजयाचा अंदाज भोवला: लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी मध्यप्रदेशातील एका प्राध्यपकाने त्याचं मत व्यक्त करत भाजपला ३०० हून जास्त जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला. मात्र हे मत व्यक्त करणं त्याला महागात पडलं आहे कारण त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त आणि व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. पाणी प्रश्नावरुन अधिकाऱ्यांना शिवीगाळ: अमरावती जिल्ह्यात पाणी टंचाईच्या मुद्द्यावरुन एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर या चांगल्याच आक्रमक झाल्या आणि त्यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. हा सर्व प्रकार कॅमेरॅत रेकॉर्ड झाला असून त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. सविस्तर वृत्त आणि व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  4. सायन रुग्णालयात महिलेवर बलात्कार: मुंबईतील सायन रुग्णालयात एका ३७ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ३१ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा सायन रुग्णालयातच सफाईचं काम करतो. सविस्तर वृत्त पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. रक्त येत असतानाही वॉटसन खेळला: आयपीएलच्या फायनल मॅचमध्ये चेन्नईच्या टीमकडून शेन वॉटसन याने झुंज देत विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. इतकचं नाही तर, त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती आणि त्याच्या पायातून रक्त येत असतानाही तो मैदानातच खेळत असल्याचं आता समोर आलं आहे. सविस्तर वृत्त पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी