मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १४ नोव्हेंबर २०१९: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... महाशिवआघाडीत मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असणार आहे. असं वक्तव्य नवाब मलिक यांनी केलं आहे. तर दुसरी महत्त्वाची बातमी महाशिवआघाडीची बैठक आज पार पडली. यावेळी या बैठकीत एक गोष्ट निश्चित झाली आहे. तर तिसरी महत्वाची बातमी म्हणजे अमित शहा यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.
तर चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे, विदर्भातील दौऱ्यावर असताना शरद पवार यांच्या ताफ्यातील गाडीने एका बाईकला धडक दिली. ज्यामध्ये बाइकस्वार जखमी झाला. तर पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे सोन्याच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. त्यामुळे आता लग्नसराईमध्येच सोनं महाग होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर...