दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १५ मे २०१९:  राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल ते रुग्णाच्या पोटात खिळे

लोकल ते ग्लोबल
Updated May 17, 2019 | 19:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the day: आज दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या. या पैकी महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा फक्त एका क्लिकवर...

Headlines of the day:
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १५ मे २०१९:   |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई : आज दिवसभरात विविध घटना घडल्या आहेत. या घटनांपैकी दिवसभरातील महत्वाच्या अशा काही घटना आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून. आजच्या दिवसातील पहिली बातमी आहे राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाची. लोकसभा निवडणुकीनंतर राज्याच्या मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता आहे. दुसरी बातमी आहे, हवामान खात्याचे मान्सूनच्या भाकिताची..  तिसरी बातमी बॉलिवूडमधून आहे, आदित्य पांचोली याच्यावर अभिनेत्रीवर बलात्काराचा आरोप लावण्यात आला आहे.  चौथी बातमी मानवतेची आहे, रमजान सुरू असताना त्याने एकाचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान केले. तर पाचवी जबदस्त बातमी ही एका रुग्णाच्या पोटातून खिळे, लोखंडी तार काढल्याची आहे. 

  1. लोकसभा निकालानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल? लोकसभा निकालासाठी अवघे आठ दिवस शिल्लक असताना आता राज्यातील भाजप सरकारने विधानसभेच्या तयारीला सुरूवात केली आहे. निकालानंतर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. सविस्तर वृत्त पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. हवामान खाते म्हणते, मान्सून सहा जूनला केरळमध्ये येणार मान्सूनपूर्व पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे कधी एकदा पाऊस येतोय आणि धरणीला शांत करतोय, याचीच प्रत्येकजण वाट पाहू लागला आहे. हवामान शास्त्र विभागाने मान्सून केरळमध्ये सहा जूनला पोहचेल, असे म्हटलं आहे. सविस्तर वृत्त पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. अभिनेता आदित्य पांचोलीवर १३ वर्षांनंतर केला अभिनेत्रीच्या बहिणीने बलात्काराचा आरोप अभिनेता आदित्य पांचोलीच्या विरोधात पुन्हा एकदा मारहाण आणि शोषणाचा आरोप लावण्यात आला आहे. हा आरोप बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बहिणीनं केला आहे. जाणून घ्या काय आहे हे नेमकं प्रकरण. सविस्तर वृत्त पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  4. रोजा तोडून त्याने हिंदू मित्रासाठी केले रक्तदान; वाचा मानवता धर्माची कहाणी हिंदू मित्राला रक्ताची गरज असल्याचे समजल्यानंतर मुस्लिम मित्र मदतीला धावून आला आहे. पवित्र रमजान महिन्यातील उपवास सोडून त्याने मित्राला रक्त दान केले आहे. आसाममधील मंगलदोयी जिल्ह्यात ही घटना आहे. सविस्तर वृत्त पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. रूग्णाच्या पोटातून काढले ११६ खिळे आणि लोखंडाची तार; जीव वाचवण्यात यश राजस्थानात सरकारी हॉस्पिटलमध्ये झालेल्या ऑपरेशनमध्ये एका व्यक्तीच्या पोटातून ११६ लोखंडी खिळे, लोखंडाची एक मोठी तार आणि एक लोखंडी गोळी बाहेर काढण्यात आली. या ऑपरेशननंतर डॉक्टरही याविषयी आश्चर्य व्यक्त करत आहेत. सविस्तर वृत्त पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी