दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ जुलै २०१९: डोंगरी दुर्घटना ते भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवड

लोकल ते ग्लोबल
Updated Jul 16, 2019 | 21:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

divasbharatil batmya
दिवसभरातील ५ बातम्या  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात. मुंबईतील डोंगरी भागात चार मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १०हून अधिक जणांचा जीव गेला तर अनेक जण अद्यापही ढिगाऱ्याखाली दबले आहेत. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील मंत्रीपदीही कायम राहणार आहेत. नाशिकच्या सप्तश्रृंगी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पतीने आपल्या पत्नीला कड्यावरून ढकलून दिल्याची घटना घडली. याप्रकरणी आरोपी पतीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. महेश मांजरेकर यांची मुलगी सई लवकरच सलमानच्या दबंग ३मध्ये त्याच्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारताच्या रोहित शर्माने सर्वाधिक धावा केल्या असल्या तरी त्याला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड काही मोडता आलेला नाही. 

  1. LIVE UPDATE: [VIDEO] मुंबईतील डोंगरी येथे इमारत कोसळली, मृतांचा आकडा वाढला - मुंबईच्या डोंगरी भागात आज चार मजली इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढवण्याची अधिक शक्यता आहे. ढिगाऱ्याखाली अद्याप काही जण अडकले आहे. केसरबाई इमारतीत ५ ते २० कुटुंबे राहत होती. ही मजली इमारत ८० वर्षे जुने होती. मात्र तरीही या इमारतीचे नाव धोकादायक इमारतीमध्ये नव्हते. वाचा सविस्तर बातमी
  2. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील तर मुंबई भाजप अध्यक्षपदी 'या' नेत्याची निवड - राज्यातील विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपमध्ये खांदेपलट होत आहे. रावसाहेब दानवे यांना राज्यमंत्री पद देण्यात आल्याने प्रदेशाध्यक्ष पद रिक्त होते. या पदावर आता चंद्रकांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले असले तरी ते मंत्रीपदीही कायम राहणार आहेत. मुंबई भाजप अध्यक्षपदी  प्रभात लोढा यांची वर्णी लागली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा
  3. मंदिरात दर्शन घेतल्यावर पत्नीसोबत फोटो काढला, नंतर शिखरावरुन दिलं ढकलून- सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या पतीने आपल्या पत्नीला सतीच्या कड्यावरून ढकलून दिल्याची घटना समोर आली आहे. आरोपी बाबूलाल काळे याने देवीच्या दर्शनानंतर आपल्या पत्नीला कड्यावरून ढकलून दिले. हा प्रकार तेथे उपस्थित एका व्यक्तीने पाहिले असता आरोपीला तातडीने पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. संपूर्ण बातमी वाचा
  4. Salman Khan Dabangg 3: महेश मांजरेकरांची कन्या सलमान खानसोबत करणार रोमान्स - मराठीतील प्रसिद्ध महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर लवकरच दबंग खान सलमानसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. सई आगामी दबंग ३ या सिनेमात दिसणार असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये सोनाक्षी सिन्हा असणार आहेच. या सिनेमात सलमान दोन अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना प्रेक्षकांना दिसेल. हा सिनेमा २० डिसेंबरला रिलीज होणार आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
  5. Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरचा 'हा' विक्रम आजही अबाधित; कोण कोण होत शर्यतीत? - वर्ल्डकपची फायनल झाली तरी अद्याप याचा फिव्हर काही उतरलेला नाही. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये अनेक रेकॉर्ड झाले. रोहित शर्माने या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक ६४८ धावा केल्या. मात्र त्याला सचिन तेंडुलकरचा वर्ल्डकपमधील रेकॉर्ड मोडता आला नाही. हा विक्रम सचिनच्या नावावर अबाधित आहे. सचिनने एका वर्ल्डकपमध्ये ६७३ धावा केल्या होत्या. संपूर्ण वाचण्यासाठी क्लिक करा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ जुलै २०१९: डोंगरी दुर्घटना ते भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवड Description: Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच आणखी एक धक्का बसण्याची शक्यता 
राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच आणखी एक धक्का बसण्याची शक्यता 
INX Media case: काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक
INX Media case: काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक
जीएसटीने केला घोळ; पार्ले कंपनी दहा हजार कामगारांना काढून टाकणार
जीएसटीने केला घोळ; पार्ले कंपनी दहा हजार कामगारांना काढून टाकणार
पाकिस्तानला मोठा झटका देण्यासाठी मोदी सरकारने केला 'हा' सर्वात मोठा प्लान
पाकिस्तानला मोठा झटका देण्यासाठी मोदी सरकारने केला 'हा' सर्वात मोठा प्लान
Baramulla Encounter: कलम ३७० लागू झाल्यानंतर पहिल्यांदा दहशतवादी- लष्करात चकमक 
Baramulla Encounter: कलम ३७० लागू झाल्यानंतर पहिल्यांदा दहशतवादी- लष्करात चकमक 
P Chidambaram INX Media case: चिदंबरम यांच्या अडचणींमध्ये वाढ; सर्वोच्च न्यायलयाकडूनही अद्याप दिलासा नाही
P Chidambaram INX Media case: चिदंबरम यांच्या अडचणींमध्ये वाढ; सर्वोच्च न्यायलयाकडूनही अद्याप दिलासा नाही
काँग्रेस नेते चिदंबरम मुलामुळे गोत्यात? काय आहे, आयएनएक्स मीडिया केस?
काँग्रेस नेते चिदंबरम मुलामुळे गोत्यात? काय आहे, आयएनएक्स मीडिया केस?
भारतीय सैन्याला मोठं यश, अभिनंदनला ताब्यात घेणाऱ्या पाकिस्तानी कमांडोचा खात्मा
भारतीय सैन्याला मोठं यश, अभिनंदनला ताब्यात घेणाऱ्या पाकिस्तानी कमांडोचा खात्मा