दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ मे २०१९: साध्वी प्रज्ञाचं वादग्रस्त वक्तव्य ते मुंबईतील चित्रा थिएटरला टाळं

लोकल ते ग्लोबल
Updated May 16, 2019 | 21:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the day: आज दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या. या पैकी महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा फक्त एका क्लिकवर...

16 may 2019 big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या 

मुंबई : आज दिवसभरात विविध घटना घडल्या आहेत. या घटनांपैकी दिवसभरातील महत्वाच्या अशा काही घटना आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून. आजच्या दिवसातील पहिली बातमी आहे भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशभक्त असल्याचं साध्वी प्रज्ञाने म्हटलं आहे. दुसरी बातमी आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील गाडीला झालेल्या अपघाताची. महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे हा अपघात झाला आहे. तिसरी बातमी आहे पाणी टंचाई संदर्भातील. पाणी भरण्याच्या वादातून एका महिलेचे कान कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चौथी बातमी आहे तुमच्या-आमच्या आरोग्या संदर्भातील. नागपुरातील एका रेस्टॉरंटमधील सांबारमध्ये पाल आढळली आहे. पाचवी बातमी आहे मुंबईतील प्रसिद्ध चित्रा थिएटर बंद होण्या संदर्भातील.

  1. नथुराम गोडसे देशभक्त - साध्वी प्रज्ञा: लोकसभा निवडणुकीत भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी नथुराम गोडसे देशभक्त असल्याचं म्हटलं आहे. साध्वी प्रज्ञाच्या या वक्तव्यावर त्यांच्याच पक्ष असलेल्या भाजपने त्यांचा निषेध केला आहे. सविस्तर वृत्तासाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. मोहन भागवतांच्या ताफ्यातील गाडीला अपघात: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील गाडीला चंद्रपुरात अपघात झाला आहे. या अपघातात मोहन भागवत यांचे चार सुरक्षारक्षक जखमी झाले आहेत. सविस्तर वृत्त आणि व्हिडिओसाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. पाण्याच्या वादातून महिलेचे दोन्ही कान कापले: कर्नाटकमधील कोलार जिल्ह्यात एका महिलेचे कान कापल्याची घटना समोर आली आहे. पाणी भरण्यावरुन वाद झाला आणि त्यानंतर पाच जणांनी मिळून महिलेचे दोन्ही कान कापले. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  4. सांबारमध्ये पाल: नागपुरातील प्रसिद्ध फूड प्रोडक्ट हल्दीरामच्या आउटलेटमध्ये ग्राहकाला देण्यात आलेल्या सांबारमध्ये चक्क पालीचं पिल्लू आढळलं आहे. सांबारमध्ये आढळलेल्या या पालीचा फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या घटनेनंतर हे आउटलेट बंद करण्यात आलं आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. मुंबईतील चित्रा थिएटर बंद: मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या चित्रा थिएटर बंद करण्याचा निर्णय मालक दारा मेहता यांनी घेतला आहे. मुंबईतील दादर परिसरात असलेलं सिंगल स्क्रिन थिएटरमध्ये गुरुवारी शेवटचा शो झाला. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ मे २०१९: साध्वी प्रज्ञाचं वादग्रस्त वक्तव्य ते मुंबईतील चित्रा थिएटरला टाळं Description: Headlines of the day: आज दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या. या पैकी महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा फक्त एका क्लिकवर...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles