दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ ऑगस्ट २०१९: LoC जवळ गोळीबार ते एम्स रुग्णालयाला आग

Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या 

मुंबई: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात. आजच्या दिवसभरातील पहिली बातमी आहे ती म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्या संदर्भातील. पाकिस्तानच्या कुरापती काही थांबताना दिसत नाहीयेत. आता पुन्हा एकदा पाकिस्तानने शस्त्र संधीचं उल्लंघन केलं आहे. एलओसीजवळ पाकिस्तान सैन्याने केलेल्या या शस्त्र संधीच्या उल्लंघनानंतर त्याला भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याची एक चौकीही उद्ध्वस्त केली आहे. दुसरी बातमी आहे माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या प्रकृती संदर्भातील. अरुण जेटली यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जेटली यांची प्रकृती नाजूक असली तरी स्थिर आहे. तिसरी बातमी आहे पाकिस्तानच्या पदरी काश्मीर प्रश्नावरुन पुन्हा एकदा आलेल्या अपयशाची. चौथी बातमी आहे बजरंग पुनिया, दीपा मलिक यांना जाहीर झालेल्या खेलरत्न तर रवींद्र जडेजाला जाहीर झालेल्या अर्जुन पुरस्काराची. पाचवी आणि शेवटची बातमी आहे दिल्लीतील प्रसिद्ध एम्स रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या संदर्भातील.

  1. पाकिस्तानकडून LoCजवळ गोळीबार, भारताने दिलं चोख प्रत्युत्तर: पाकिस्तान सैन्याने आज सकाळच्या सुमारास शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय हद्दीत गोळीबार केला. पाकिस्तान सैन्याने केलेल्या या गोळीबाराला भारतीय सैन्याने देखील चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र, या कारवाई दरम्यान भारताचा एक जवान शहीद झाला आहे. भारतीय सैन्याने या कारवाई दरम्यान पाकिस्तानी सैन्याची एक चौकी उद्ध्वस्त केली आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. अरुण जेटलींची प्रकृती चिंताजनक: माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जेटली यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबतच इतरही मोठ्या नेत्यांनी रुग्णालयात पोहोचले होते. अरुण जटली यांची प्रकृती नाजूक आहे मात्र, स्थिर आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. पाकिस्तान तोंडावर आपटलं: जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर भांबावलेल्या पाकिस्तानने हा मुद्दा आंतरराष्ट्रीय बनवला आणि संयुक्त राष्ट्रात नेला. मात्र, तेथे सुद्धा पाकिस्तानच्या पदरी निराशाच आल्याचं दिसून आलं. चीनच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही देशाने पाकिस्तानला पाठिंबा दिला नाही. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.  
  4. बजरंग, दीपाला खेलरत्न तर जडेलाला अर्जुन पुरस्कार: भारतामधील क्रीडाक्षेत्रात असलेला सर्वोच्च पुरस्कार खेलरत्न हा जाहीर झाला आहे. कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पॅरा अॅथलेट दीपा मलिक यांना हा खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तर क्रिकेटर रवींद्र जडेजा याला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. एम्स रुग्णालयाला आग: दिल्लीतील प्रसिद्द असलेल्या एम्स रुग्णालयाला आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.अग्निशमन दलाच्या ३४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ ऑगस्ट २०१९: LoC जवळ गोळीबार ते एम्स रुग्णालयाला आग Description: Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
मोठी बातमी: 'या' सहा आमदारांनी धरला काँग्रेसचा हात
मोठी बातमी: 'या' सहा आमदारांनी धरला काँग्रेसचा हात
[VIDEO]: धक्कादायक! प्रेम संबंधांमुळे तरुणाला बेदम मारहाण करत जबरदस्ती पाजली लघुशंका
[VIDEO]: धक्कादायक! प्रेम संबंधांमुळे तरुणाला बेदम मारहाण करत जबरदस्ती पाजली लघुशंका
चांद्रयान २: आज अतिशय मोठी अपडेट मिळणार, लँडर विक्रमशी संपर्क होणार? 
चांद्रयान २: आज अतिशय मोठी अपडेट मिळणार, लँडर विक्रमशी संपर्क होणार? 
PM Narendra Modi birthday: नरेंद्र मोदींनी घेतले आईचे आशीर्वाद
PM Narendra Modi birthday: नरेंद्र मोदींनी घेतले आईचे आशीर्वाद
[VIDEO]: आमदाराच्या कारची पादचाऱ्याला धडक, घटनास्थळीच मृत्यू
[VIDEO]: आमदाराच्या कारची पादचाऱ्याला धडक, घटनास्थळीच मृत्यू
[VIDEO]: Honour Killing: नवदाम्पत्याला गाडीखाली चिरडले आणि नंतर गोळ्या झाडून हत्या
[VIDEO]: Honour Killing: नवदाम्पत्याला गाडीखाली चिरडले आणि नंतर गोळ्या झाडून हत्या
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ सप्टेंबर २०१९:  जैश-ए-मोहम्मदची धमकी ते सरकारी नोकरीची संधी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ सप्टेंबर २०१९: जैश-ए-मोहम्मदची धमकी ते सरकारी नोकरीची संधी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ सप्टेंबर २०१९: चांद्रयानबाबत मोठी अपडेट ते मराठी तरुणांना सरकारी नोकरीची संधी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ सप्टेंबर २०१९: चांद्रयानबाबत मोठी अपडेट ते मराठी तरुणांना सरकारी नोकरीची संधी