दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ ऑक्टोबर २०१९: खडसेंचा गौप्यस्फोट ते निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका 

Headlines of the 17 October 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

whole day news 17 october 2019 big headline jabardast 5 news day Times now marathi vidhansabha election 2019 eknath khadse bjp harshavardhan jadhav shivsena nilesh rane pm modi delhi zoo latest update
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ ऑक्टोबर २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ ऑक्टोबर २०१९: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... भाजप नेते एकनाथ खडसे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध पक्ष नेतेपदाची ऑफर दिली होती. तर दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे कन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञातांनी काल मध्यरात्री हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 
तर तिसरी महत्वाची बातमी आहे ती, नारायण राणे यांचे सुपूत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. 

तर चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे, 2022 पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचवणार असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. ते परळीतील सभेत बोलत होते. पाचवी महत्त्वाची बातमी दिल्लीच्या प्राणीसंग्रहालयात एक तरुण अचानक सिंहाच्या पिंजऱ्यात घुसला. यावेळी तरुण अगदी थोडक्यात सिंहाच्या तावडीतून बचावला. या सगळ्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर... 

  1. एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट; राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर होती, पण...: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. खडसेंच्या गौप्यस्फोटामुळे राज्याच्या राजकारणात मोठा खळबळ माजली आहे. सविस्तर वृत्त पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ला, गाड्यांची तोडफोड: कन्नड अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी मध्यरात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास जाधव यांच्या समर्थनगर भागातल्या घरावर हा हल्ला करण्यात आला. सविस्तर वृत्त पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. 'बीएमसी चोर कोकणात आला होता आणि परत गेला', निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला: नारायण राणे यांचे सुपूत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंची बुधवारी कणकवलीत प्रचारसभा पार पडली. सविस्तर वृत्त पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  4. PM Modi: 2022 पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचवण्याचा संकल्प, मोदींकडून परळीकरांसाठी भरघोस योजना: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज महाराष्ट्रात तीन सभा होत आहेत. त्यापैकी पहिली सभा ही परळीत पार पडली. या सभेत मोदींनी बीडकरांसाठी अनेक योजनांची घोषणा केली. सविस्तर वृत्त पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. [VIDEO] सिंहाच्या पिंजऱ्यात घुसला तरुण, मृत्यू समोर दिसताच बसली पाचावर धारण, पाहा व्हायरल व्हिडिओ: २०१४ साली एक अशी घटना घडली होती की, ज्यामध्ये दिल्लीती एक तरुण अचानक प्राणीसंग्रहालयातील वाघाच्या पिंजऱ्यात पडला होता. ज्यानंतर वाघाने त्याचा जीव घेतला होता. त्यावेळी ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाल्याने काही क्षणात व्हायरल झाली होती. आज देखील पुन्हा तशीच घटना घडली आहे. सविस्तर वृत्त पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी