दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १८ एप्रिल २०१९: भाजप नेत्यावर चप्पल फेक ते सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 18, 2019 | 22:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the day: आज दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या. या पैकी महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा फक्त एका क्लिकवर...

18 april 2019 big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १८ एप्रिल २०१९ 

मुंबई: आज दिवसभरात विविध घटना घडल्या आहेत. या घटनांपैकी दिवसभरातील महत्वाच्या अशा काही घटना आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून. आजच्या दिवसातील पहिली बातमी म्हणजे भाजपचे प्रवक्ते आणि खासदार जीवीएल नरसिंह राव यांच्यावर भर पत्रकार परिषदेत चप्पल फेकण्यात आली आहे. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. दुसरी बातमी आहे मोदीं संदर्भात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. तिसरी बातमी म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेची. राज ठाकरे यांची गुरूवारी पुण्यात जाहीर सभा झाली. या सभेतही राज ठारे यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया गुरूवारी पार पडली. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील १० जागांवर तर देशभरातील ९५ जागांसाठी मतदान पार पडलं. पाचवी बातमी नागरिकांसाठी आनंदाची आहे, कारण लग्नसराईच्या काळात सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

  1. भाजप नेत्यावर चप्पल फेक: दिल्लीतील भाजप मुख्यालयात भाजप प्रव्ते आणि खासदार जीवीएल नरसिंह राव हे पत्रकार परिषद घेत असताना त्यांच्यावर चप्पल फेकण्यात आली आहे. या बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. हेलिकॉप्टर तपासणारा अधिकारी निलंबित: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. ही बातमी सविस्तर पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. राज ठाकरेंची पुण्यात सभा: राज ठाकरेंची पुण्यात जाहीर सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. राज ठाकरेंचं अनकट भाषण पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  4. दुसऱ्या टप्प्यात किती टक्के मतदान: लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात मतदान प्रक्रिया पार पडली. या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या दहा लोकसभा मतदारसंघात मतदान झालं. देशभरात कुठे आणि किती टक्के मतदान झालं हे पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. सोनं-चांदी झाली स्वस्त: सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. लग्नसराईत सोनं-चांदी स्वस्त झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोनं-चांदी नेमक्या किती रुपयांनी स्वस्त झाली आणि सध्या सराफा बाजारात काय दर आहे या संदर्भातील सविस्तर बातमी पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १८ एप्रिल २०१९: भाजप नेत्यावर चप्पल फेक ते सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण Description: Headlines of the day: आज दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या. या पैकी महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा फक्त एका क्लिकवर...
Loading...
Loading...
Loading...