दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १८ ऑगस्ट २०१९: पाक समर्थकांना भिडल्या शाझिया इल्मी ते भारताचा पाकला इशारा

Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या 

मुंबई: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात. आजच्या दिवसभरातील पहिली बातमी आहे ती म्हणजे भारताच्या शाझिया इल्मी यांनी पाकिस्तानी समर्थकांना दिलेल्या चोख प्रत्युत्तराच्या संदर्भातील. दक्षिण कोरियातील सेऊल येथे पाकिस्तानचे समर्थक भारत आणि पंतप्रधान मोदींविरोधात घोषणाबाजी करत होते त्यावेळी तेथे पोहोचलेल्या भारताच्या शाझिया इल्मी यांनी त्या पाक समर्थकांना सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे.  दुसरी बातमी आहे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिलेल्या इशाऱ्याच्या संदर्भातील. आता पाकिस्तानसोबत केवळ पाकव्याप्त काश्मीरच्याच मुद्द्यावरुन चर्चा होईल असं वस्तव्य राजनाथ सिंह यांनी केलं आहे. तिसरी बातमी आहे जम्मूमध्ये पुन्हा एकदा मोबाइल आणि इंटरनेट सेवा बंद केल्याच्या संदर्भातील. चौथी बातमी आहे टीम इंडियाचा माजी क्रिकेटर प्रवीण कुमार याच्या सासऱ्यांच्या अपघाती मृत्यू संदर्भातील. पाचवी आणि शेवटची बातमी आहे काबूलमध्ये लग्न समारंभात झालेल्या आत्मघाती स्फोटाच्या संदर्भातील. 

  1. भारताविरोधात घोषणा देणाऱ्या पाक समर्थकांना भिडल्या भारताच्या शाझिया: जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाल्याचं दिसत आहे. अशाच प्रकारे काही पाकिस्तानी समर्थक दक्षिण कोरियातील सेऊल येथे भारताच्या आणि पंतप्रधान मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. या ३०० पाकिस्तानी समर्थकांना भारताच्या शाझिया इल्मी यांनीच उत्तर दिलं आहे. सविस्तर वृत्त आणि व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. भारताचा पाकिस्तानला इशारा: जो पर्यंत पाकिस्तान दहशतवाद थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत चर्चा होणार नाही. तसेच आता पाकिस्तासोबत केवळ पाक व्याप्त काश्मीर (पीओके) च्या मुद्द्यावरुनच चर्चा होईल असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. हरियाणा येथील पंचकूलामध्ये एका जनसभेला संबोधित करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य केलं आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. जम्मूमध्ये पुन्हा मोबाइल आणि इंटरनेट सेवा बंद: जम्मूमधील पाच जिल्ह्यांत पुन्हा एकदा मोबाइल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर भारत सरकारकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. जम्मूमध्ये पसरवल्या जाणाऱ्या अफवा रोखण्यासाठी आता पुन्हा एकदा मोबाइल आणि इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  4. माजी क्रिकेटर प्रवीण कुमारच्या सासऱ्यांचा अपघाती मृत्यू: टीम इंडियाचा माजी क्रिकेटर प्रवीण कुमार याच्या सासऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. प्रवीण कुमार याचे सासरे अनिल कुमार हे इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गेले असता त्यांचा पाय घसरला आणि ते खाली पडले. गंभीर जखमी झालेल्या अनिल कुमार यांचा अखेर मृत्यू झाला. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. काबूलमध्ये लग्न समारंभात आत्मघाती स्फोट: अफगाणस्तानातील काबूल येथे एका लग्न समारंभात एक मोठा स्फोट झाला. या स्फोटात जवळपास ६३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर १८० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी काबूलमधील बारातघर येथे हा आत्मघाती स्फोट झाला. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १८ ऑगस्ट २०१९: पाक समर्थकांना भिडल्या शाझिया इल्मी ते भारताचा पाकला इशारा Description: Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
मोठी बातमी: 'या' सहा आमदारांनी धरला काँग्रेसचा हात
मोठी बातमी: 'या' सहा आमदारांनी धरला काँग्रेसचा हात
[VIDEO]: धक्कादायक! प्रेम संबंधांमुळे तरुणाला बेदम मारहाण करत जबरदस्ती पाजली लघुशंका
[VIDEO]: धक्कादायक! प्रेम संबंधांमुळे तरुणाला बेदम मारहाण करत जबरदस्ती पाजली लघुशंका
चांद्रयान २: आज अतिशय मोठी अपडेट मिळणार, लँडर विक्रमशी संपर्क होणार? 
चांद्रयान २: आज अतिशय मोठी अपडेट मिळणार, लँडर विक्रमशी संपर्क होणार? 
PM Narendra Modi birthday: नरेंद्र मोदींनी घेतले आईचे आशीर्वाद
PM Narendra Modi birthday: नरेंद्र मोदींनी घेतले आईचे आशीर्वाद
[VIDEO]: आमदाराच्या कारची पादचाऱ्याला धडक, घटनास्थळीच मृत्यू
[VIDEO]: आमदाराच्या कारची पादचाऱ्याला धडक, घटनास्थळीच मृत्यू
[VIDEO]: Honour Killing: नवदाम्पत्याला गाडीखाली चिरडले आणि नंतर गोळ्या झाडून हत्या
[VIDEO]: Honour Killing: नवदाम्पत्याला गाडीखाली चिरडले आणि नंतर गोळ्या झाडून हत्या
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ सप्टेंबर २०१९:  जैश-ए-मोहम्मदची धमकी ते सरकारी नोकरीची संधी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ सप्टेंबर २०१९: जैश-ए-मोहम्मदची धमकी ते सरकारी नोकरीची संधी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ सप्टेंबर २०१९: चांद्रयानबाबत मोठी अपडेट ते मराठी तरुणांना सरकारी नोकरीची संधी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ सप्टेंबर २०१९: चांद्रयानबाबत मोठी अपडेट ते मराठी तरुणांना सरकारी नोकरीची संधी