दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १९ एप्रिल २०१९: पंतप्रधान मोदींची मुलाखत ते राज ठाकरेंकडून मोदी सरकारची पोलखोल

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 19, 2019 | 22:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the day: आज दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या. या पैकी महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा फक्त एका क्लिकवर...

whole day news 19 april 2019 big headline jabardast 5 news
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १९ एप्रिल २०१९ 

मुंबई: आज दिवसभरात विविध घटना घडल्या आहेत. या घटनांपैकी दिवसभरातील महत्वाच्या अशा काही घटना आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून. आजच्या दिवसातील पहिली बातमी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाइम्स नाऊ ला दिलेली एक्सक्लुझीव्ह मुलाखत. या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध प्रश्नांवर सडेतोड उत्तरे दिली. दुसरी महत्वाची बातमी म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस पक्षाला एक मोठा झटका बसला आहे. कारण, काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेस पक्षाचा हात सोडून आपल्या हातावर शिवसेनेचं शिवबंधन बांधलं आहे. तिसरी बातमी म्हणजे गुजरातमधील पाटीदार नेते आणि नुकतचं काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या हार्दिक पटेल यांना भर सभेत एका व्यक्तीने कानशिलात लगावली आहे. दिवसभरातील चौथी बातमी म्हणजे भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा यांनी एटीएसचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्यावर केलेलं धक्कादायक वक्तव्य. पाचवी आणि शेवटची बातमी म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेची. रायगडमधील महाड येथे झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरेंनी मोदी सरकारची पोलखोल केली आहे. 

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदींची EXCLUSIVE मुलाखत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाइम्स नाऊला एक विशेष मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी विविध मुद्दे, प्रश्न आणि आरोपांवर आपली मतं मांडली आहे. नरेंद्र मोदींची ही एक्सक्लुझीव्ह मुलाखत पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. प्रियंकाचा काँग्रेसला रामराम: काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. प्रियंका यांनी काँग्रेस पक्ष का सोडला आणि शिवसेनेत प्रवेश का केला? या सर्वांची उत्तरे आणि सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. VIDEO हार्दिक पटेलच्या कानशिलात लगावली: काँग्रेसमध्ये नुकत्याच प्रवेश केलेल्या हार्दिक पटेल यांना एका व्यक्तीने सभेत कानशिलात लगावली आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या बातमीचा व्हिडिओ आणि सविस्तर बातमी पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  4. भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा यांचं धक्कादायक वक्तव्य: मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञा यांनी एटीएसचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्या संदर्भात एक वादग्रस्त आणि धक्कादायक असं वक्तव्य केले आहे. साध्वी प्रज्ञा यांनी नेमकं काय म्हटलं आहे हे पाण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत मोदी सरकारची पोलखोल: राज ठाकरे यांनी रायगड येथे झालेल्या जाहीर सभेत मोदी सरकारच्या योजना कशा फोल ठरल्या आहेत याचं उदाहरण व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून दाखवलं आहे. या बातमीचा व्हिडिओ आणि सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १९ एप्रिल २०१९: पंतप्रधान मोदींची मुलाखत ते राज ठाकरेंकडून मोदी सरकारची पोलखोल Description: Headlines of the day: आज दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या. या पैकी महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा फक्त एका क्लिकवर...
Loading...
Loading...
Loading...