मुंबई: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात. शिवसेनेचे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. दरम्यान ते ही यासाठी उत्सुक असल्याचे संकेतच त्यांनी यावेळी दिले. एनकाऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. मोबाईल फोनच्या वेडापायी एका तरूणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. राजस्थानच्या अल्वरमध्ये मॉब लिंचिंगची घटना घडली आहे. येथील एका दलित तरूणाला गावातील जमावाने जबर मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची २१ जुलैला घोषणा केली जाणार आहे. वेस्ट इंडिजचा दौरा ३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.