दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १९ नोव्हेंबर २०१९: वारकऱ्यांच्या दिंडीला अपघात ते दिल्लीत भूकंपाचे धक्के

Headlines of the 19 November 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर... 

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या 

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १९ नोव्हेंबर २०१९: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज  दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... वारकऱ्यांच्या दिंडीत जेसीबी घुसल्याने झालेल्या अपघातात दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दुसरी बातमी आहे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री असलेल्या रामदास आठवले यांना टोला लगावला आहे. तिसरी बातमी आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व आमदारांची शुक्रवारी बैठक बोलावली आहे. चौथी बातमी आहे राज्यातील महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण जाहीर केल्यानंतर आता ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. पाचवी आणि शेवटची बातमी आहे दिल्ली आणि परिसरात जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांची. 

  1. वारकऱ्यांच्या दिंडीला अपघात, नामदेव महाराजांच्या वंशजांचा मृत्यू: पंढरपूर येथून आळंदीकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीला अपघात झाला. या अपघातात संत नामदेव महाराजांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास यांचा मृत्यू झाला. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. राऊतांचा आठवलेंना जोरदार टोला: शिवसेना आणि भाजप यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करु नका. केंद्रात तुम्हाला केद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे त्यात आपले अधिकार वाढवण्याचा प्रयत्न करा अशा टोला संजय राऊत यांनी रामदास आठवले यांना लगावला आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व आमदारांची शुक्रवारी एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे हे आमदारांसोबत चर्चा करुन मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  4. जिल्हा परिषद अध्यक्ष पदांसाठीचे आरक्षण जाहीर: महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठीचे आरक्षण मंगळवारी जाहीर करण्यात आले. या आरक्षणानुसार राज्यातील ३४ जिल्हा परिषदांचं अध्यक्षपद हे कोणासाठी आरक्षित आहे हे पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. दिल्ली आणि परिसरात भूकंपाचे धक्के: दिल्ली, एनसीआर या परिसरात संध्याकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचं केंद्रबिंदू हे नेपाळ आणि भारताच्या सीमेजवळ असल्याचं समोर आलं आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी