दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० ऑगस्ट २०१९: अभिनंदनला ताब्यात घेणाऱ्याचा खात्मा ते उदयनराजे भाजपच्या वाटेवर

Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

big headline jabardast 5 news of day
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या 

मुंबई: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात. आजच्या दिवसभरातील पहिली बातमी आहे ती म्हणजे भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांना ताब्यात घेणाऱ्या पाकिस्तानी कमांडो अहमद खान याचा खात्मा केल्याच्या संदर्भातील. पाकिस्तानी कमांडो अहमद खान याचा भारतीय सैन्याने खात्मा केला आहे. अहमद खान हा दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यास मदत करत होता. एलओसी जवळ भारतीय सैन्याने अहमद खान याला ठार केलं आहे. दुसरी बातमी आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावल्यानंतर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केलेल्या आवाहनाच्या संदर्भातील. राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्याना एक आवाहन केलं आहे. तिसरी बातमी आहे मॅन व्हर्सेस वाईल्ड या शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले आणि त्याचं प्रसारण सर्वत्र झालं. आतात या शोच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवा विक्रम केल्याचं समोर आलं आहे. चौथी बातमी आहे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद याने भारताविरुद्ध गरळ ओकली. पाचवी बातमी आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर असल्याच्या संदर्भातील.

  1. अभिनंदन यांना ताब्यात घेणाऱ्या पाकिस्तानी कमांडोचा खात्मा: भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन यांना ताब्यात घेणाऱ्या पाकिस्तानी कमांडोचा खात्मा करण्यात आला आहे. १७ ऑगस्ट रोजी भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईत पाकिस्तानी कमांडो अहमद खान याचा नियंत्रण रेषा (एलओसी) जवळ खात्मा केला आहे. अहमद खान हा दहशतवाद्यांना भारतात प्रवेश करण्यासाठी मदत करत होता. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  2. २२ ऑगस्टला शांतता राखा: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल प्रकरणी ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. त्यासाठी २२ ऑगस्ट रोजी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ईडीच्या या नोटीशीनंतर मनसेकार्यकर्ते संतापले असून त्यांनी बंदचं आवाहन केलं होतं. मात्र, कार्यकर्त्यांनी शांतता राकावी असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. Man vs Wild मधून मोदींचा विक्रम: डिस्कव्हरी चॅनलवरील प्रसिद्ध असलेल्या मॅन व्हर्सेस वाईल्ड या शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहायला मिळाले. नरेंद्र मोदींचा हा विशेष एपिसोड जगातील सर्वात ट्रेंडिंग टेलिव्हिजन इव्हेंट ठरला आहे. जगभरातील १८० देशांमध्ये या शोचं प्रसारण करण्यात आलं होतं. सविस्तर वृत्तासाठी या लिंकवर क्लिक करा.
  4. भारतावर अणूबॉम्ब टाकून नष्ट करू: जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच तीळपापड झाला आहे. पाकिस्तानी नेते, सेलिब्रेटी आणि क्रिकेटर्सही गरळ ओकत आहेत. आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटर जावेद मियाँदाद याने गरळ ओकली आहे. वेळ आली तर आम्ही अणूबॉम्बचा वापर करून नष्ट करु असं मियाँदाद याने म्हटलं आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  5. उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर: महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले हे भआजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मंगळवारी उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्या भेटीनंतर उदयनराजे यांनी भाजपत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...