दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० ऑक्टोबर २०१९: धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल ते पंकजांची पहिली प्रतिक्रिया

Headlines of the 20 October 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

whole day news 20 october 2019 big headline jabardast 5 news day Times now marathi pankaja munde dhananjay munde video clip vidhansabha election 2019 rain voting army pakistan attack latest update
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० ऑक्टोबर २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० ऑक्टोबर २०१९: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यावर पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसरी महत्त्वाची बातमी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर तिसरी महत्वाची बातमी या सगळ्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी आज एक पत्रकार परिषद बोलवली होती. यावेळी पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे हे खूपच भावूक झाल्याचं दिसून आले. 

तर चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे, राज्यात उद्या होणाऱ्या मतदानावर पावसाचं सावट असल्याचं दिसतं आहे. कारण की, पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पाचवी महत्त्वाची बातमी म्हणजे आज भारतीय लष्कराने पीओकेमधील दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर काँग्रेसने याबाबत मोदी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर... 

  1. 'धनंजयने फेसबुकवरची ती पोस्ट डिलीट का केली? त्याने आता तरी खोटं बोलू नये', पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया: निवडणुकीला अवघे काही तास शिल्लक असताना पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचं दर्शन घेतलं याचवेळी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर माध्यमांना आपली पहिली प्रतिक्रिया दिली. सविस्तर वृत्त पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. 'त्या' क्लिप प्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल, धनंजय मुंडे म्हणाले...: धनंजय मुंडे यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे आणि या क्लिपमध्ये धनंजय मुंडे यांनी खालच्या पातळीवर जाऊन पंकजा मुंडेंवर टीका केल्याचं दिसत आहे. दरम्यान, या व्हिडिओ क्लिप प्रकरणी आता परळी पोलीस ठाण्यात धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. [VIDEO]: धनंजय मुंडे म्हणतात, 'मला असं वाटलं हे जग सोडून जावं': धनंजय मुंडे यांनी परळीत पत्रकार परिषद बोलावून आपल्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे हे भावूक झाल्याचं पहायला मिळालं. तसेच आपल्याला जग सोडून जावंस वाटलं होतं असंही बोलले. सविस्तर वृत्त पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  4. पुढील दोन दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता, मतदानावरही पावसाचं सावट: सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि राज्यातील बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानावर पावसाचं सावट असणार आहे. सविस्तर वृत्त पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  5. 'निवडणुका असल्यावरच पाकिस्तानबाबत सर्जिकल पॅटर्न का होतो?' काँग्रेस नेत्याचा सवाल: लष्कराकडून करण्यात आलेल्या या कारवाईवरुन आता राजकारण देखील जोरदार सुरु झालं आहे. काँग्रेसचे नेते अखिलेश सिंह यांनी लष्कराच्या या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सविस्तर वृत्त पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी