दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० सप्टेंबर २०१९: अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा ते उद्धव ठाकरेंचं युतीबाबत वक्तव्य

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 20, 2019 | 23:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the 20 September 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर.

leatest news1_Times Now
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० सप्टेंबर २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० सप्टेंबर २०१९: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज एक अतिशय महत्त्वपूर्ण घोषणा केली. आर्थिक मंदीतून सावरण्यासाठी करण्यात आलेली ही सर्वात मोठी घोषणा आहे. तर दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे उद्या  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सुमारे ५० हजार भारतीयांना अमेरिकेत संबोधित करणार आहेत. तर तिसरी महत्वाची बातमी आहे ती, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यातील युतीबाबत उद्धव ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 

तर चौथी महत्त्वाची बातमी म्हणजे, अमित शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये २२ सप्टेंबरला पुन्हा मेगाभरती होणार आहे. याचवेळी युतीवरही अंतिम निर्णय होणार असल्याचं बोललं जात आहे. पाचवी महत्त्वाची बातमी अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने कॉलेजवयीन तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जाणून घ्या या सगळ्या बातम्या सविस्तर... 

  1. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा आर्थिक मंदीतून सावरण्यासाठी भारत सरकारकडून विविध प्रयत्न सुरु आहेत. त्याचा एक भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पत्रकार परिषदेत एक मोठी घोषणा केली आहे. सविस्तर वृत्त पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  2. हाऊडी मोदी कार्यक्रमावर सर्व जगाच्या नजरा, ट्रम्प करू शकतात मोठी घोषणा: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संकेत दिले आहेत की, रविवारी ह्युस्टनमध्ये होणाऱ्या हाऊडी मोदी कार्यक्रमात एक मोठी घोषणा करू शकतात. या कार्यक्रमात ट्रम्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सुमारे ५० हजार भारतीय अमेरिकी नागरिकांना संबोधित करणार आहेत. सविस्तर वृत्त पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  3. उद्धव ठाकरेंचं युती संदर्भात मोठं वक्तव्य: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये. त्यामुळे अद्याप तरी युतीची घोषणा झालेली नाहीये. सविस्तर वृत्त पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  4. अमित शहांच्या उपस्थितीत भाजपची पुन्हा मेगाभरती, युतीवरही होणार अंतिम निर्णय: लोकसभा निवडणुकीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना लागलेली गळती काही थांबण्याचं दिसत नाहीये. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दिग्गज नेत्यांनी आतापर्यंत शिवसेना-भाजपत प्रवेश केला आहे. सविस्तर वृत्त पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. 
  5. अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, पाहा कॉलेजवयीन तरुणीने काय केलं!: आपल्या उज्ज्वल भविष्याचचं स्वप्न पाहणारी आणि एका हाय प्रोफाइल कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीचं संपूर्ण आयुष्य छेडछाड, बलात्कार आणि अश्लील व्हिडिओ यामुळे बरबाद झालं. सविस्तर वृत्त पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...