मुंबई: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात. आजच्या दिवसभरातील पहिली बातमी आहे ती म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या अटकेच्या संदर्भातील. पी चिदंबरम यांना सीबीआयने त्यांच्या दिल्लीतील घरातून अटक केली आहे. पी चिदंबरम हे गेल्या २७ तासांपासून संपर्कात नव्हते आणि त्यांनी बुधवारी रात्री अचानक काँग्रेस मुख्यालयात प्रवेश करत पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर सीबीआयची टीम चिदंबरम यांच्या घरी दाखल झाली आणि त्यांना अटक केली आहे. दुसरी बातमी आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना ईडीने चौकशीसाठी नोटीस पाठवल्यानंतर ठाण्यातील एका मनसे कार्यकर्त्याने केलेल्या आत्महत्येच्या संदर्भातील. तिसरी बातमी आहे राज ठाकरे यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा केलेल्या जाहीर आवाहनाच्या संदर्भातील. चौथी बातमी आहे पाकिस्तानला झटका देण्यासाठी मोदी सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याच्या संदर्भातील आणि पाचवी बातमी आहे पार्ले कंपनीतून दहा हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्याच्या संदर्भातील.